Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: माझी ओळख

Monday, January 30, 2006

माझी ओळखसावधान हो सावधान.
ज्यास्त बुचकल्यात न पडता मी तुम्हाला माझी ओळख करुन देतो. मी एक अज्ञानी, अडाणी पामर. ( असे म्हटले की म्हणणारा खूपच मोठ्ठा माणुस आहे हे आपोआप सिध्द होते.) तसा मी यंत्र अभियंता. (सुचना: चार बूके शिकला म्हणून काही अक्कल येत नाही. इती- मला ओळखणारे सगळे.)
नांव दिलीप कुलकर्णी. आता शेक्सपियर ने म्हटले आहे म्हणे पण मी अजून तरी नाही वाचले " नावात काय आहे?" त्याला म्हणायला काय जाते. समजा उद्या त्याला कोणी छगन किंवा चम्या म्हणाले तर स्वत: त्याला काय वाटेल? असो. जन्मलो लातुर ला. हा हेच ते लातुर, आधी दुष्काळग्रस्त, नंतर शिक्षणग्रस्त ( १२ वी मध्ये सतत ५ वर्ष लातुरकर राज्यात प्रथम आले होते.) आणी राजकारणग्रस्त ही. मध्ये भूकंपामुळे सगळ्या जगाला माहिती झालेले.
मजल दरमजल करत कसेतरी शिक्षण पुर्ण करून पुणे मुक्कामी रुजू झालेला. १२ वर्षे तिथे पाट्या टाकल्यानंतर ज्यास्त पैसे कमावण्याच्या मोहापायी वाळवंटाच्या देशात, इथे दुबई ला पोहोंचलेला.
फावल्यावेळात अनेक संकेतस्थळांना भेटी दिल्यानंतर मलाही काहीतरी लिहिण्याची खुमखुमी सुटली. पण सत्य कल्पनेपेक्षा महा भंयकर कटू असते ह्याची जीवनात दुसर~यांदा खात्री पटली. पहिल्यांदा पटली होती ते कथित प्रेयसीला मेक अप शिवाय एकदा पाहण्याचे धाडस केले होते, त्यावेळेस. पण म्हंटले प्रयत्न करायचाच. कोणी तरी म्हणालेच आहे " प्रयत्नांती परमेश्वर" म्हणून. ह्याचा अर्थ एकाने " प्रयत्न करून करून आपला अंत झाल्यावर परमेश्वर भेटतो" असा घेतलेला. पण आता मला शंका येवू लागली आहे की खरच मला काही लिहिता येणार का? एक वेळेस अनिल कुंबळे चा चेंडु वळेल, बिपाशा पुर्ण कपडे घातलेली दिसेल पण मला लिहीता येणे? देखेंगे आगे आगे होता है क्या?
तुमच्या ग्रहकुंडलीतच मला `सहन' करण्याचा योग लिहिला असला तर मी तरी काय करणार?
आता एकच विनंती की कोणाचा कसलातरी सूड उगवायचा म्हणून माझे लिखाण वाचण्याचा आग्रह किंवा सुचना करू नका.

1 Comments:

Anonymous sundar said...

ata 2012 varsh ujadale ahe, mage valun pahatana kase vatatay?

3:08 AM  

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>