सचिन ने निवृत व्हावे का?
(एका `तेज' डोके चालणा~या वाहिनीने विचारेल्या वरील सवाला
वर माझी प्रतिक्रिया.)
म्हणतात ना यशाचे पाठीराखे भरपुर असतात आणी अपयशाचा धनी तो स्वत.
तसेच आज सचिन चे झाले आहे. सबसे `तेज' वाल्यांची डोकीही तेवढीच तेज
चालतात वाटते.
खर सांगायचे तर सचिनला विश्रांती द्यायची काही गरज नाही. मी त्याच्या धावा
किंवा मागच्या सरासरीच्या पुण्याईवर खेळतच रहावे, अगदी अपयश कितीही
वेळा आले तर असे म्हणत नाही. इतिहास साक्षी आहे. प्रत्येक वेळेस एकादा
गोलंदाज डोईजड होतो आहे असे वाटले की सचिनने वायफळ बडबड
न करता त्या सगळ्याची बत्तीशी धडाकेबाज फलंदाजीने त्यांच्याच घशात
घातली आहे. अशा सा~या गोलंदाजा विरूद्ध नेहमीच यशस्वी प्रत्त्युतर दिलेले
आहे.
`तेज' वाल्यांनी तर पुढे जावून असे ही तारे तोडले कि जेंव्हा सचिन
खिलाडू वॄतीने पंचाच्या निर्णाया आधीच मैदान सोडून गेला तो शोयब अख्तरची
गोलंदाजीला घाबरून ती टाळण्यासाठी निघून गेला. हा `तेज' वाल्यांनी केलेला आणी
याची देहि याची डोळा माझ्या आयुष्यात ऐकलेला सर्वात मोठ्ठा विनोद.
शोयब पाच एकदिवशीय सामन्यांचे घोडा मैदान जवळच आहे. तेंव्हा
`उपरवाले" के पास अभ्भीशेच वशिला लगाव मिंया.
-दिलीप कुलकर्णी
दुबई. यु. ए. ई.
1 Comments:
>> शोयब अख्तरची गोलंदाजीला घाबरून ती टाळण्यासाठी
>> निघून गेला
हे तारे मोईन खान ने तोडले होते
Post a Comment
<< Home