Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: टवाळा आवडे विनोद..

Thursday, February 02, 2006

टवाळा आवडे विनोद..

. ' मुलांनो, हत्ती व माशी यांच्यात फरक काय? गुरुजींनी विचारले.

स्कॉलर मनू उत्तरली, 'हत्तीला पंख नसतात. माशीला पंख असतात.'

' शाब्बास!' गुरुजी गदगदले, 'आता नन्या, तू सांग हत्ती-माशीतला फरक!'

नन्या म्हणाला, 'माशी हत्तीच्या अंगावर बसू शकते, हत्ती माशीच्या अंगावर बसू शकत नाही!!!'

***************************
कोण चढलेत झाडावर?' करवादे काकू ओरडत बागेत आल्या. पेरूच्या झाडावरून नन्याची फौज खिसे भरून खाली आली. 'काय करत होतात रे?'

' काकू काकू', नन्या गोडव्याचा परमावधी करत म्हणाला, 'आमची विटी अडकली होती झाडावर!'

' हात मेल्या, ही विटी तर मी गेले चार महिने पाहतेय आमच्या झाडावर. तेव्हाच का नाही रे आठवण आली तुम्हाला विटीची?'

' कारण तेव्हा पेरू पिकले नव्हते,' नन्यानं धूम ठोकता ठोकता उत्तर दिले.

**************************************

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>