Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: हम - तुम ( बाळकांड)

Saturday, February 04, 2006

हम - तुम ( बाळकांड)

(महाराष्ट्र टाईम्स च्या सौजन्याने.)
हम-तुम (बालकांड)

मुलींना लहान वयातही मुलांची ओढ असते.

मुलांना लहान वयात मातीची, चिखलाची, डबक्यांची ओढ असतो.

...........................
मुली मुलांच्या आधी बोलायला शिकतात.

मुले बोलण्याच्या आधी तोंडातून मशीन गनचे आवाज काढायला शिकतात.

टीव्हीवरच्या सिनेमात कुणी मेलंबिलं तर मुली धाय मोकलून रडतात.

असला मारामारीचा आणि मरामरीचा सिनेमा सुरू असताना चॅनेल बदलला तर मुलं धाय मोकलून रडतात.

मुलगा जेव्हा गप्प असतो...

तेव्हा त्याच्याकडे बोलण्यासारखं काही नसतं.

मुलगी जेव्हा गप्प बसते...

तेव्हा तिच्या मनात लाखो उलाढाली सुरू असतात.

लहान मुली मोठ्या होऊन स्त्रिया बनतात.

छोटी मुलं मोठी होऊन मोठी मुलं बनतात.
.........................

लहान मुलीकडे तुम्ही एक बॉल फेका...

... तो बहुतेक वेळा तिच्या नाकावर आदळेल.

लहान मुलाकडे तुम्ही बॉल फेका...

... तो बॉल झेलायचा प्रयत्न करील...

... पण, बहुतेकवेळा बॉल त्याच्याही नाकावर आदळेल!!!

........................................
दिवाळीत कुणाकडे पाहुणे म्हणून जाण्यासाठी तुम्ही मुलीला नवा ड्रेस घालून नटवा...

... ती अगदी छान दिसत असेल... पोहोचायला तासभर उशीर होईल, ते सोडा.

दिवाळीत तुम्ही मुलाला नवा ड्रेस घालून नटवा...

... तो दोन मिन्टांत तयार होईल...

पण, प्रत्यक्षात जायला निघण्याआधीच तो कुठूनतरी छानपैकी मळून येईल!!!

........................................
मुलांची रूम सहसा अत्यंत गबाळी, अस्ताव्यस्त असते.

मुलींची रूमही गबाळी, अस्ताव्यस्तच असते... फक्त तिथला गबाळेपणाही 'सुवासिक' असतो!!!
.........................................

मुलीला रस्त्यात झाडाची फांदी सापडली, तर ती फांदी कौतुकाने निरखत राहते.
मुलाला अशी फांदी सापडली की लगेच फिरवून तिची गन करून तो ठिश्यांव ठिश्यांव गोळीबार सुरू करतो.

.,.....................................

* केस कसे कापले गेले याविषयी मुलं बेफिकीर असतात. जसे कापले, ती आपली नवी स्टाइल म्हणून ते स्वीकारतात.

मुलींचे केस जर चुकीचे कापले गेले, तर त्या दोन आठवडे घराबाहेरच पडायच्या नाहीत.

.....................................

मुलीच्या हातात आईची मेकअप बॉक्स लागली तर त्या लगेच तोंड रंगवायला सुरुवात करतात.

मुलांच्या हातात आईची मेकअप बॉक्स लागली तर तेही लगेच रंगवायला सुरुवात करतात... पण घराच्या भिंती!!!
..............................

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>