Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: वाळवंटाच्या देशात...

Saturday, February 18, 2006

वाळवंटाच्या देशात...

वाळवंटाच्या देशात...
...झगमगत्या दुनियेत !!!
परत एकदा नमस्कार मित्रहो,
बऱ्याच मित्रांनी आग्रह केल्यामुळे आणी तो न मोडता आल्याने आता
दुबई च्या झगमगत्या दुनियेबाबत एक मालिका सुरु करण्याचे मनावर
घेत आहे. अनेक लोंकाचे दुबई बाबत ज्या परिकल्पना आहेत,
काही समज आणी सोबतच गैरसमजही.
पाहुया प्रयत्न तर करतो आहे, शक्य तेवढी जास्त आणी सत्यच सांगेन.
( हे काही न्यायालय नाही, शपथेवर खोटे बोलायला.) फक्त प्रयत्न असा
असेल की ही माहिती सांगताना न तुम्हाला वाचतानाही तोच तो रटाळपणा
येत आहे असे वाटु नये. सोबतच तुम्हांलाही काही विचारायचे झाल्यास
त्याचेही स्वागत आहे.
भौगोलीक माहिती सांगायची झाल्यास सात राज्ये आपल्या गरजा
आणी सुरक्षाही लक्षात घेवुन संघटीत झाले ते संयुक्त अरब अमिरातच्या
झेंड्याखाली. अबु धाबी ही राजधानी व एकुण क्षेत्रफळ ८३,६०० चौरस
कि.मी. दुबई, शारजाह, रास अल खैमाह, फुजिराह, उम्म अल क्वैवान
व अजमान ही इतर राज्ये. लोकसंख्या २४ लाख मुळ अरब मुस्लीम
परंतु बाहेरचे आलेलेच लोक त्यांच्यापेक्षा संख्येने ज्यास्त. चलन म्हणाल तर दिरहाम आहे आणि १ दिरहाम म्हणजे सध्याच्या दराने १२.२० रुपये.
काहीतरी वेगळा अनुभव, परदेश पहाण्याची ओढ, विमानप्रवासाचे आकर्षण आणी भारतात राहून जेवढा पैसा कमवू शकतो त्यापेक्षा जास्तीची `हाव' हेच आपली माती, आपली मानसं ह्यांच्यापासून दूर जाण्यास कारणे ठरली. एक मन म्हणायच की परदेशी चाललास. वेगळ लोक, वेगळी संस्कृती, भाषा पहायाला मिळेल. चार नविन नविन गोष्टी शिकायला मिळतील. असा विचार करुन मनाला समजावले आणी निघालो.
विमानतळावर प्रवेश केला. सुरक्षा तपासणीचा सोपस्कार उरकला. विमान उड्डाणाला अजुन २ तास अवकाश होता. बरेच लोक प्रतिक्षा कक्षात होते. काही माझ्यासारखे नवखे व बुजरे, काही सराईत( गुंड नव्हे) प्रवासी. एक गोष्ट अजब वाटली. माझ्यासारख्या साध्या सरळ माणसाला एवढ्या अग्निदिव्यातुन जावे लागले. तर मग बॉबस्फोट करुन हे लोक कसे सहजा सहजी पळाले? ( खाल्ली ना माती, घेतली ना शंका? कुठेही जा, मराठी माणुस शंका काढणारच.) माझ्या लायकी प्रमाणे शंका ही लघूच होती. त्यामुळे कारणही सापडले. पैसा हो पैसा आणी त्याचे लालच. बॉबस्फोट करणारेही भारतीयच, त्याची झळ पोंहोचलेलीही भारतीयच, चोरट्या वाटेने पळून जाण्यास मदत करणारे ही भारतीय आणी कायद्याचा किस पाडून त्यातील पळवाटा शोधणारे ही भारतीय. हे सगळे असाह्य व निमुटपणे पहाणारे आपणही भारतीयच. एकंदरीत काय `मेरा भारत महान'.
कोणी एका विद्वानाने म्हंटलेच आहे, " पैसा भगवान नही है" व त्यासोबत आणखी एका विद्वानाने म्हंटलेय " लेकिन पैसा भगवानसे कमभी नही है" आणी हे दोन्ही वाक्य माझ्यासारख्या तिसऱ्या विद्वानाला माहित आहे. ह्याचा परिचय देणाऱ्या दोन गोष्टी लागलीच अनुभवाला मिळाल्या.
पहिली म्हणजे एक बाई, एका हातात बॅग आणी कडेवर मुल घेवुन जिणा उतरत होती. तिने अवघड झाले म्हणून तिथल्या एका कामगाराला मदतीला बोलावले. पण त्याने तिकडे कानाडोळा करुन एक गोऱ्या जोडप्याच्या मदतीला गेला. मी पहातच राहिलो. ( दुसरे काही करु शकतो का?). नंतर तो कामगार माझ्या बाजुला येवून त्याचे `चेतना चुर्ण' म्हणजे तंबाखू मळत बसला. न राहवून मी त्याला जाब विचारला की बाबा तु आपल्या माणसाला मदत करायची सोडून त्या ईंग्लिश जोडप्याकडे का धावलास? त्यावर तो म्हणाला "ह्या बाईला मदत केली आसती तर ज्यास्तीत ज्यास्त आभार मानले असते. पण त्या गोऱ्याने मला २ डॉलर बक्षिस दिले. आता तुम्ही सांगा, मी शहाणा ठरलो कि नाही".
मी मनातल्या मनात विचार केला खरच होते की त्याचे. पैसा बोलता है, दुसरे काय? मनोमनी मी त्याला साष्टांग दंडवत केला. (क्रमश:)

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>