Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: तुम्हीच ठरवा ह्याला काय म्हणायचे?

Saturday, February 18, 2006

तुम्हीच ठरवा ह्याला काय म्हणायचे?

तुम्हीच ठरवा ह्याला काय म्हणायचे?
संदीप हा भैय्यासाहेब देशमुखांचा एकुलता एक मुलगा. दोन दिवसांवरच त्याच्या पदवी परिक्षेचा निकाल होता. भैय्यासाहेबांचे संदीपला खुप खुप शिकवण्याची इच्छा होती आणी संदीपही तसा हुशारच होता. आतापर्यंत तो नेहमी पहिल्या तिघात असायचा. त्यामुळे पदवी मिळवल्यावर ते त्याला एक मौल्यवान भेट देणार होते.
संदीपही ती भेट कोणती ते जाणुन घेण्यास उत्सूक होता. त्याने अशी ही तयारी केली होती की भैय्यासाहेबांनी जर त्यालाच विचारलेच व निवडीचा पर्याय दिला तर तो चांगली स्पोर्ट कार घेणार होता. तशी एक गाडी त्याने पाहून ठेवली होती. आपला हट्ट पुरवणे तसे भैय्यासाहेबांना अवघड नाही व पैशाची काही कमतरता नाही. त्यामुळे आपण निकालाच्या दिवशी आपल्या आवडत्या गाडीमधून फिरणारच अशी त्याची मानसिक तयारीही झाली होती. म्हणुन तो एकदम खुषीत होता.
आणी अखेर तो दिवस उजाडला, ज्याची तो आतुरतेने वाट पहात होता. सकाळी सकाळीच भैय्यासाहेबांनी त्याला आपल्या खोलीत बोलवून घेतले. प्रेमाने जवळ घेवून म्हणाले, " संदीप, तुझ्या सारखा गुणी, हुशार आणी सालस मुलगा मिळणे खुप कमी लोकांच्या नशिबी असते. त्यामुळे मला तुझा खुप अभिमान वाटतो. नेहमी प्रमाणे आजही तु यशस्वी होणारच अशी माझी खात्री आहे. त्यासाठी माझ्याकडुन ही छोटीसी भेट देत आहे. तुला ती नक्कीच आवडेल, अशी आशा आहे." असे म्हणत त्यांनी एका सुंदर आवरण असलेला बॉक्स त्याच्या हाती दिला.
अती उत्साहाने व नाराजीनेच त्याने तो बॉक्स उघडला, पहातो तर त्यात भगवद गीतेची प्रत होती.
ते पहाताच संतापाच्या भरात तो म्हणाला, " एवढ्या मोठ्या मिळकतीचे मालक असुन तुम्ही मला भेट काय देताय तर हे?" असे म्हणत तो रागाने, ती भेट तिथेच ठेवून, रागे रागे घर सोडुन निघून गेला.
त्यानंतर बराच काळ लोटला. त्याने परत कधी घराकडे परतण्याची तसदी घेतली नाही. आपल्या अंग हुषारी, मेहनती व कलागुणांच्या जोरावर त्याने अनेक व्यवसायात नांव व पैसा कमावला. त्यासोबतच सुशिल पत्नी आणी गोंडस मुले अशा सुखी आणी यशस्वी जीवन जगत होता. आलिशान गाडी, टुमदार बंगला, नौकर चाकर सगळी सुखे त्याच्या समोर हात जोडून उभी होती. त्यामुळे दरम्यानच्या काळात ना त्याला आपल्या वडीलांशी संपर्क साधावा वाटला, ना तशी गरज वाटली.
पण हल्ली त्याला वाटु लागले होते की आपले वडील आता म्हातारे झाले आसतील. त्यांना एकदा तरी पहावे. मनाशी तयारी करुन त्याने वडीलांना भेटण्यासाठी जायचे ठरवले. पत्नी आणी मुलेही त्याच्या हया विचाराशी सहमत व आनंदी झाली. सगळी तयारी करुन निघणार एवढ्यात त्याच्या हातात `तार' येवून पडली. संदेश होता, " तुमच्या वडीलांना देवआज्ञा झाली. त्यांनी सगळी संपत्ती तुमच्या नांवे केली आहे. तरी ताबडतोब येवून, सगळी संपत्ती आपल्या ताब्यात घ्यावी हि विनंती." मन भरुन आले त्याचे, कसेतरी स्वताला आवरुन तो वडिलांच्या घरी आला.
घरी येताच त्याला जाणिव झाली की आपण सगळेच गमावले. दुर्देव असे की आपल्याला शेवटचे दर्शन ही मिळू शकले नाही. डोळ्यात पाणी अन जड अंतकरणाने तो वडिलांची महत्वाची कागद पत्रे शोधु लागला. कागद्पत्रा सोबतच त्याला सापडली तिच भगवद गीतेची प्रत, जशीच्या तशी नवी कोरी. डोळ्यात पाणी थांबत नव्हते. त्याला आठवले ह्याच क्षणी आपण आपल्या वडिलांना शेवटचे पाहिले होते. भरल्या अंतकरणाने तो त्याची पाने चाळू लागला. इतक्यात त्यातून काही तरी जमिनीवर पडल्याचा आवाज आला. तो उचलून पहातो तर काय? ती होती कार ची चावी अन त्यासोबतच जोडलेली चिट्ठी त्याच्या पदवीदान सभारंभाची तारीख असलेली, आणी त्याच विक्रेत्याची जिथे त्याने कार निवडली होती त्याची, लिहीले होते PAID IN FULL.


....दिलीप कुलकर्णी. दुबई. १८.०२.०६

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>