Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: म्हणी, नशिब, अपवाद व आपण!!!

Sunday, February 26, 2006

म्हणी, नशिब, अपवाद व आपण!!!

म्हणी, नशिब, अपवाद व आपण!!!
काल बसची वाट पहात थांब्यावर उभा होतो. गर्दी तशी फारशी नव्हती. एकुण ५-६ लोक असतील. इतक्यात एक आज्जीबाई आणी तिचा नातु तिथे आले. त्यांच्यात काहीतरी बिनसले होते वा त्या बाई त्याला उपदेशाचे डोस पाजत होत्या. त्या म्हणाल्या, "चुली पुढं हागायचं आनं नशिबात होतं म्हणायचं, अस कस जमल बाबा?" इतक्यात माझी बस आली व मी निघालो. पण त्या आज्जीबाईंनी वापरलेली ती `म्हण' डोक्यातुन जाता जाईना.
एक तर खुप दिवसांनी इतकी चपखलपणे बसणारी म्हण एकायला मिळाली व दुसरे म्हणजे नशिबावर गरजेपेक्षा ज्यास्त अवलंबुन रहाणाऱ्यांसाठी एक शालजोडा ही वाटला. खर सांगायचे म्हणजे मलाही खुप चिड आहे, नशिब नशिब म्हणत आपल्या अपयशावर ढोंगीपणे पांघरुण घालणाऱ्यांची. असो, जावू द्या, विषयांतर होते आहे. त्यावर परत कधी बोलू. आता फक्त म्हणी आणी म्हणींवरच..
हजारो वाक्ये वापरून जो परिणाम साधता येत नाही, त्यावेळेस एखादी म्हण सगळा आशय गर्भीत करते. बरे प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे म्हणयाचे तर त्यासाठीही पर्यायी म्हणी आहेतचकी. बाळपणांपासून आपला तसा म्हणींशी संबध येतोच की.
आता कांही म्हणींबाबत गमती जमती. एक म्हण, " बाप तसा बेटा अनं कुंभार तसा लोटा" अस म्हणाव म्हंटल तर अमिताभ बच्चन व अभिषेकला ती लागु होत नाही. मग त्यांना कोणती म्हण लागु होते? " मुळांपोटी केरसुनी". (क्रमश:)

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>