Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: मुंबईकरा तुला आणी तुझ्यातल्या माणसाला सलाम

Tuesday, July 11, 2006

मुंबईकरा तुला आणी तुझ्यातल्या माणसाला सलाम

कुठे छिन्नविच्छिन्न झालेले देह... तर कुठे रक्‍ताचा सडा. ट्रॅकवर विव्हळत असणारे जखमी प्रवासी. या प्रत्येकाच्या मदतीला कोणताही मागचा-पुढचा विचार न करता स्थानकाच्या परिसरात राहणाऱ्या सामान्य मुंब‌ईकरांनी धाव घेतली. तुफान पा‌ऊस, खंडित करण्यात आलेला विद्युतपुरवठा या कशाकशाचीही पर्वा न करता येथील तरुणांनी ट्रॅकवर विखुरलेले देह गोळा केले. ....

.... सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास जेव्हा स्फोट झाल्याचा आवाज जवळच्या वसाहतीतील रहिवाशांना ऐकू आला तेव्हा माहीम स्थानकाच्या शेजारच्या दिवाण अपार्टमेंट, कुबल अपार्टमेंट, सुरेखा मॅन्शन, राठोड मॅन्शन या प्रत्येक वसाहतीतील तरुणांचे गट रेल्वेस्थानकाकडे धावले. याच गटात सुनीलकुमार दास होता. त्याने त्याचा मित्र मनीषकुमार राठोडच्या मदतीने सात मृतदेह बाहेर काढले. या प्रसंगाला अत्यंत धैर्याने तोंड देणाऱ्या सुनीलकुमारचा काही वेळाने अक्षरशः बांध फुटला. ट्रॅकवर पडलेला मृतदेह आहे, असे समजून त्याने हाताने उचललेल्या पंचविशीतील तरुणाचा श‍वास सुरू होता. त्याने त्याला घे‌ऊन सायन हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या ऍम्ब्युलन्सकडे धाव घेतली. पण त्याच क्षणी त्या तरुणाने प्राण सोडला. या भीषण प्रसंगामध्ये धावून आलेल्या सुनीलकुमार दासला आपल्याला एकही जीव वाचवता आला नाही हे सांगताना रडू आवरता आले नाही. स्फोटाचा आवाज ऐकू आला तेव्हा तरुणांच्या या गटाने स्थानकावरील पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. मात्र तेथे एकही पोलिस नव्हता. त्यामुळे आता आपणच पुढे हो‌ऊन मदत केली पाहिजे, असे ठरवून ते सर्व जण मदतीसाठी पुढे सरसावले. येथे गटागटाने उभे असणारे तरुण एकमेकांना धीर देत होते. पत्रकारांना माहिती देत होते. तसेच येथील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी पोलिसांनाही सहकार्य करीत होते. जीवाच्या भीतीने पायीच घर गाठणाऱ्या नागरिकांसाठी माहीम, माटुंगा आणि दादर या मार्गादरम्यान पावसातही ही मंडळी एकमेकांना मदत करीत होती. "कुछ नहीं होगा, डरो मत' यांसारख्या शब्दांनी आधार दे‌ऊ पाहत होती.


गर्भवती स्त्रिया, अपंग यांना इच्छितस्थळी पोहोचवण्यासाठी ट्रक-टेम्पोसारखी वाहने गाठून देण्यासाठी हे गट मदत करीत होते. मृतदेहांना घे‌ऊन जाणाऱ्या ऍम्ब्युलन्स, पोलिसांच्या व्हॅन्स आणि भेदरलेल्या मुंब‌ईकरांच्या गर्दीने हा सारा परिसर गोंधळून गेला होता. प्रचंड आवाज, अस्वस्थता आणि घबराट अशा परिस्थितीतही एकमेकांना आधार देणाऱ्या येथील रहिवाशांकडून यापुढे कुणीही आपल्याला मदत करणार नाही, आपणच आपल्याला

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>