Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: परत एकदा सुरूवात...

Monday, March 29, 2010

परत एकदा सुरूवात...


लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
सुरेश भट




नमस्कार मराठी मित्रांनो,
बरेच दिवस झाले, कांही लिहणे जमलेच नाही. कारणे तिच खूप खूप काम आहे, वेळ मिळत नाही, वगेरे वगेरे...असो.
मागच्या आठवड्या मध्ये परत आपण कांही मराठी मंडळी भेटलो. पण वेगळ्या वेगळ्या वेळी आणी वेगळ्या वेगळ्या कारणासाठीं. सगळ्यांचे एकमत झाले कि आपण सगळे नियमीत भेटायला पाहिजेच.कांहीतरी करायला पाहिजे. हे कांहीतरी नेमके काय आहे ते मात्र ठरले नाही.
तर आत परत श्रीगणेशा करतोय.
मागच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणातून कांही गोष्टींची काळजी सुरूवातींपासूनच घ्यायची हे ठरले. वेळो-वेळी कळवले जाईलच, नेमके काय ते. असो.
आता जे मराठी मित्र खरेच ह्याबाबत गंभीरपणे विचार करत आहेत, त्यांना नम्र विनंती कि त्यांनी परत एकदा आपली माहिती मला पाठवावी.
माहिती मध्ये पुढील बाबींचा समावेश अनिवार्य आहे.
१. नांव, २. मूळ गांव, ३. सध्याचे भारतातील वास्तव्य, ३. जन्म तारीख, साल नसले तरी चालेल. ४. संयुक्त अरब इमिराती मधले वास्तव्य, ५. किती वर्षे. ६.विवाहीत असाल तर, विवाहाची तारीख, ७, ईमेल, ८. मोबाईल क्रमांक. ९. ईमेल व मोबाईल क्रमांक इतरांना देण्याची परवानगी, १०.व्यवसाय, ११. आवड आणी भविष्यातील काही योजना, शक्य असेल तर.
हि सगळी माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र दिनी हया ब्लॉग वर प्रकाशित केली जाईल. नविन सभासदांची माहितीही दर आठवड्याला प्रकाशित केली जाईल.
ज्या सभासदांची कोणा नविन मराठी मित्रांची ओळख झाल्यास त्याबाबतची माहिती मला पाठवल्यास सर्वांसाठी प्रकाशित केली जाईल.
बाकींच्या योजना नंतर समक्ष भेटीत ठरवू या.
आपल्या सर्वांच्या सहकार्यांची आणी मार्गदर्शनाची अपेक्षा.
आपला स्नेहांकित,
दिलीप कुलकर्णी.
०५० ३८३४५४७

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>