माणसा, कधी रे होशिल `माणुस` तु...???
जिवंत आईला ठेवले चितेवर... पोटच्या मुलांनी अन् मुलींनीही!
आईचे उपकार, तिचे वात्सल्य, तिच्या थोरवीचं वर्णन करणारे जगातील कोणत्याही भाषेतील शब्द क्षणात गोठून जावे, निष्प्रभ ठरावे, अशी काळीज पिळवटून टाकणारी आणखी एक घटना आंध्रात घडली आहे. .......पंच्याहत्तर वर्षे वयाच्या एका अभागी वृद्धेला पोटच्या मुला-मुलींनीच जिवंतपणी चितेवर ठेवून तिची जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. केवळ दैव बलवत्तर म्हणून ती वाचली असली, तरी कोणाही सहृदयी माणसाला हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे समाजातील एक भीषण वास्तव तीव्रतेने समोर आले आहे.
आंध्रातील विशाखापट्टणमजवळच्या गजुवाका गावातील पद्मावती या वृद्ध विधवेच्या दुर्दैवाची ही कहाणी. किरकोळ व्यवसाय आणि थोडीफार शेती करणारा; पण जगण्याचा मोठा आधार असलेला घरधनी जग सोडून गेल्यावर तिची परवड सुरू झाली. त्यातच तिला दोन वर्षांपासून कर्करोगानेही ग्रासले. विशाखापट्टणमच्या किंग जॉर्ज रुग्णालयात अधूनमधून ती उपचार घेत होती. गेल्या काही दिवसांत तिचा आजार आणखी बळावला आणि तिच्या मुलांनी पुन्हा तिला या रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी तिची प्रकृती ढासळत असल्याचे यापूर्वीच सांगितले असल्याने, आता ही तिची शेवटचीच खेप ठरणार, हेही या मुलांनी गृहीत धरले होते. पण अतिदक्षता विभागात दोन दिवस उपचार मिळाल्यावर पद्मावतीची प्रकृती स्थिरावली, थोडीफार सुधारलीही. त्यामुळे तिला घरी घेऊन जाण्यास डॉक्टरांनी या मुलांना सांगितले.
पण असे घडणार नव्हते. पद्मावतीच्या कन्या आणि एका पुत्ररत्नाने आपल्या आईला घरी नेण्याऐवजी रुग्णवाहिकेत घालून थेट स्मशान गाठले. तोपर्यंत नात्या-गोत्यातील काही लोकही तेथे बोलावून घेतले होते. स्मशानातील कर्मचाऱ्यांना निद्रिस्त आई दाखवीत मृतदेह आणल्याचे त्यांनी सांगितले. मग अंत्यविधीची तयारी झाली, चिताही रचली गेली. दोन मुलीही आपल्या जिवंत आईच्या चितेवर स्वतःच्या "स्त्री'त्वाला, मातृत्वाला अग्निडाग देण्यास तयार झाल्या होत्या. हार-फुलांनी मढवलेला एक सचेतन देह चितेवर ठेवण्यात आला आणि आजवर परिस्थितीच्या प्रत्येक चटक्यापासून जिवापाड जपलेला कुलदीपकच जिवंत आईला अग्नी देण्यास सरसावला. तो अग्नी देणार इतक्यात कसलीशी जाणीव झाल्याने पद्मावती जागी झाली. चितेवरची तिची हालचाल पाहून सारेच थबकले. रडण्याचे नाटक करणाऱ्या मुली, नातेवाइकांना तर एकदम कोरड पडली आणि आपण आता तुरुंगात जाणार या भीतीने इतरांना काही कळायच्या आत ते तेथून पसार झाले.
एरवी अंत्यविधीचे मूक, त्रयस्थ साक्षीदार असलेले स्मशानातील कर्मचारी तर या प्रकाराने पार हबकून गेले होते. पण, त्यांनीच भानावर येत पद्मावतीला चितेवरून खाली काढले, एका बाकावर बसवले, शक्य तो औषधोपचारही केला. "वेळ' आली होती; पण "काळ' आला नव्हता, हेच तिचे नशीब, असे ते मानत होते. सायंकाळच्या सुमारास मुले-मुली पुन्हा तेथे आली आणि आपल्या हातून "महापाप' घडल्याचे सांगत स्मशानातील कर्मचाऱ्यांच्या हाता-पाया पडू लागली. या कर्मचाऱ्यांनी मग पोलिसांत जाण्याची धमकी देत आईला पुन्हा रुग्णालयात नेण्यास मुलांना भाग पाडले.
पद्मावतीने ज्यांना कष्टाने वाढवले, मोठे केले, त्या मुली आणि मुलगा आज चांगल्या सांपत्तिक स्थितीत आहेत. पण, कर्करोग झालेल्या आपल्या वृद्ध आईला सांभाळण्यास कोणीही तयार नव्हते. जिवंतपणी आईची जीवनयात्रा संपविण्याची अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी याच राज्यात घडली होती. व्याधी पाठीशी लागलेल्या आणि पुढे सांभाळण्यास कोणी तयार नाही, अशा स्थितीत निराधार वृद्धांवर येणारे परावलंबित्व, त्यातही दारिद्य्र, महागलेले औषधोपचार आणि वृद्धाश्रमांसारख्या आधार संस्थांची कमतरता, यामुळे ग्रामीण भागातील वृद्धांवर कसले "प्रसंग' ओढावताहेत, ते "अशा' घटनांनी पुन्हा स्पष्ट होत आहे. एका पद्मावतीच्या "शारीरिक' कर्करोगामुळे आजच्या पिढीत वाढत चाललेला "मानसिक' आणि त्यातूनच बळावणाऱ्या "सामाजिक' कर्करोगाचे एक भीषण वास्तवही प्रकर्षाने समोर आले आहे.