कृपया अन्न वाया घालवू नका - आम्हांला द्या.
मग आता काय करायचे? मोठ्ठा प्रश्र्न पडला ना?
................मग पिझ्झा मिळाला तर चालेल !!!

काय म्हणता काय? नाही चालणार..!!!
मग पास्ता कसा वाटेल.......?

काय हे हि खायची इच्छा होत नाही आज....? ठिक आहे.
मग मेक्सिकन बघा आवडते का?

परत नकोच का ? काही हरकत नाही...आपल्या जवळ त्यालाही अनेक पर्याय आहेत........
ह्म्म्मम्म्म्म ... चाइनीज ????? ??

का मग बर्गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ?

ओके... परदेशी नकोय? आपले भारतीय परवडले ?
दक्षिण भारतीय व्यंजन ??? का उत्तर भारतीय ?

का? जंक फूड खायचे आहे ?

आपल्या जवळ लागेल तेवढे पर्याय आहेत....
मसाला दोसा ?

का मांसाहार वर ताव मारायचा आहे ?

का, भरपेट खायचे आहे ?

का फक्त तंदूरी चिकन चे कांही तुकडे? का सूरमई वा पापलेट फ्राय?
तुम्ही वरील पैकी काहीही खावू शकता ... वा प्रत्येक डिश मधले थोडे थोडे चाखू शकता ...
आता खालील चित्रे पाहून, संकोचू नका किंवा बैचेन ही नका होवू...
परंतू एक लक्षात ठेवा कि ह्या लोंकापुढे काहीही पर्याय नाहीत.




त्यांना फक्त दोन घास पाहिजेत....ज्यामुळे त्यांच्या पोटातील आग कांही वेळेपूरती तरी शांत होईल आणी पुढे जगणे शक्य होईल...
पुढच्या वेळेस जेंव्हा कधी हॉटेल वा डायनिंग हॉल मध्ये जाल आणी जेवण आवडले नाही म्हणून वाया घालवाल.... त्या वेळ ह्या लोकांबाबत जमले तर नक्की विचार करा...

जेंव्हा कधी ताटात थोडीशी करपलेली किंवा कच्ची चपाती येईल.....
कदाचीत थोडासा आसट झालेला भात असेल......
किंवा मग थोडे मिठ कमी ज्यास्त झालेली भाजी असले....
तेंव्हा वाया घालवण्या पूर्वी ह्यांचा विचार करा...

कृपया अन्न वाया घालवू नका
तुम्हांला नम्र विनंती आहे कि ह्यापुढे तुमच्या घरात कोणताही कार्यक्रम वा सभारंभ असेल व अन्न थोडेसेही ज्यास्त झाले असेल वा वाया जाण्याची शक्यता असेल तर आपण न संकोचता चाइल्ड हेल्पलाईन ला फोन करा. ते येतील आणी सर्व अन्न एकत्रीत करून घेवून जातील.
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्य्ंत पोहोंचविण्याचा पर्यन्त करा, कदाचित कोणाला तरी हि महिती उपयोगी पडेल आणी भुकेल्या कांही जिवांना एक वेळचे जेवण तरी मिळेल.
आपण् नेहमी विनोद्, कविता, चारोळ्या आणी आपल्यास् आलेले बरेच् फॉरवर्डेड् इमेल् आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, सह-कर्मचाऱ्यांना व नेटवर्किंग मध्ये फॉरवर्ड करत असतो. मग ह्यावेळेस हि महिती ही तेवढ्याच उत्साहात सगळ्यांना कळवा.
म्हणतात ना प्रार्थना करण्याऱ्या ओठांपेक्षा मदत करणारे हातच जास्त चांगले उपयोगी पडतात.
मला नाही माहीत की अनेक देवांचे फोटो प्रार्थना फॉरवर्ड केल्याने कोणाचे नशिब फळफळले कि नाही किंवा करोडोंची लॉटरी वगेरे लागली कि नाही किंवा मायक्रोसॉफ्ट वा नोकिया कडून हजारो डॉलर्स मिळाले कि नाही पण हा संदेश फॉरवर्ड केलात तर नक्किच कोणाला ना कोणाला अन्न मिळून सत्कर्म ठरू शकेल.
मग आता तुमच्या सहकार्याची अपेक्षा ठेवणे रास्तच आहे ना !!!