Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: रंग-रंगीली

Monday, February 27, 2006

रंग-रंगीली

इथे एका इंग्रजी कवितेचा मुक्त अनुवाद देत आहे. हि कविता एका आफ्रिकन नवकवीची आहे. विशेष म्हणजे २००५ सालातील उत्तम कविता या पुरस्कारसाठी ह्या कवितेला नामांकन मिळाले आहे. पहा तर त्याची विलक्षण आणी अदभुत कल्पना शक्ती.

जन्माला आलो तेंव्हा मी काळा होतो
बाळपणीही काळाच राहिलो

सुर्यप्रकाशात स्वच्छंद फिरलो
तरीही काळाच राहिलो

काही वेळेस घाबरलो, भिलो
त्यावेळेस काळाच राहिलो

खुषीतही काळाच, दुखा: मध्येही तसाच
आता मरतानाही काळाच असेन.

आणी तु...

माझी गोरी सखी,

तु जन्मली तेंव्हा गुलाबी दिसायची
अशी तुझी आई सांगते.

जस वय वाढत गेलं
तु गोरी दिसायला लागलीस

उन्हात थोडीही फिरलीस की
लाल लाल होतेस,

सर्दी झाली कि काळी-निळी पडतेस,
घाबरलीस कि पांढरी फक्क दिसतेस,

शॄंगारात हिरवी हिरवी असतेस,

रुसली रागावलीस कि लाल बुंद,

आनं मरताना कशी असशील
कल्पना नाही करवत

आणी वरुन मलाच म्हणतेस....

`तु रंग बदलत असतोस'.

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>