Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: माझ्या चारोळ्या...

Sunday, March 05, 2006

माझ्या चारोळ्या...

तुझ्याविना....

तुझ्याविना माझी सगळी
वस्तीच बकाळ झाली..
विचार करता करता
न कळत सकाळ झाली..प्रतिक्षा.

मरण तर कधी ना कधी येणारच आहे...
पण तु ही येशील असा विश्वास आहे !
फक्त कोण आधी येणार ते पहायचे आहे...
तसा आता माझा तुटतो श्वास आहे !!जीवन

जीवन आणी जीणे यातले
आता कळाले अंतर...
काही तु येण्यापूर्वी....
काही तु गेल्या नंतर...!!!वेडी आसवे

तुझ्या घरावरून जाताना
हल्ली तिकडे नजर वळत नाही...
मनाचे ठीक आहे ग
पण आसवांना काहीच कळत नाही.........पाण्याचा एक थेंब..

पाण्याचा एक थेंब...
तो जर तव्यावर पडला तर त्याच
आस्तित्वचं संपत,
तो जर कमळाच्या पानावर पडला तर....
मोत्यासारखा चमकतो.
आणी जर शिंपल्यात पडला तर...
मोतीच होतो.
पाण्याचा थेंब तोच...
फरक फक्त सहवासाचा !!!!!!!!!

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>