Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: माझी चरित्रकथा!!!

Thursday, March 09, 2006

माझी चरित्रकथा!!!

प्रस्तावना.
तमाम मराठी रसिक हो, माझी ही चरित्रकथा तुमच्या चरणी अर्पण करताना मनापासुन आनंद होत आहे. प्रसुतिवेदना सहन केल्यानंतर बाळाचे मुखकमळ पहाताना जितका आनंद जन्म देणाऱ्या मातेला होतो त्या पेक्षाही हा आनंद मला ज्यास्त वाटतो. ( च्यायला, जमायला लागले कि आपल्याबी मोठमोठ्ठी वाक्ये लिहायला.)
सुरुवातीलाच तुमच्या ध्यानात आले असेल कि पुढे थोड्याच वेळात तुम्हांला एक परिपुर्ण, जिवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करुन जाणारी चरित्रकथा वाचायला मिळणार आहे. आता समसमा संयोग बघा कि एवढे अप्रतिम लिखाण तेवढ्याच तोडीच्या रसिक, दर्दी, जाणकारांच्या हाती पडत आहे. (सुचना: इथे तुम्हांला मी जी काही विशेषणे लावली आहेत, ते माझ्या सोयीसाठी, आता तुमची काय बिशाद आहे कि ह्या लिखाणाला फालतु म्हणण्याची? चुकून म्हणालाच तुम्ही फालतु तर सगळी विशेषणे परत काढुन टाकीन मग नंतर तुम्हीच विचार करा की तुमची वाचक म्हणुन काय लायकी, माफ करा मला पात्रता म्हणायचे होते.) आता तुमच्या डोक्यात प्रकाश पडलाच असेल की तुमची गाठ कसल्या पिंडाच्या लेखकाशी पडली आहे? वरील एकाच परिच्छेदावर नोंद घ्या की ह्यात सर्व विषयांचा समावेश असेल. मला आता ईथे थोडेसे विश्लेषण करुन सांगण्याची आवशक्यता भासत आहे. नाहीतर सगळे तुमच्या डोक्यावरुन जायचे. मी घसरत नाही म्हणालो, नाहीतर ज्याच्या डोक्यावर चंद्र विराजमान झाला आहे, त्यांना राग यायचा!! ( क्रमश: कारण बायको खेकसते आहे की जेवण गरम आहे तो पर्यंत घ्या गिळुन, परत गरम करायला मला वेळही नाही, आनं गॅसही महागला आहे. तुमच्या तुटपुंज्या पगारात कसे भागवते माझे मलाच माहित. मीच म्हणुन तुमच्याशी संसार करतेय. माझ्याजागी दुसरी कोणी असली आसती तर कधीच......(हे मात्र तिने मनातल्या मनात म्हंटले.))

2 Comments:

Blogger Y3 said...

वा:, प्रस्तावना लक्शवेधक झालिये..... (वाचक म्हणून आम्हास दिलेल्या विशेषणाना जागण्याचा हा प्रयत्न)...:-)
पुढील प्रकरणाच्या प्रतिक्शेत...
शुभेच्छा...
यतीन

4:13 PM  
Blogger दिलीप कुलकर्णी said...

यतीन,
मनपूर्वक धन्यवाद.
तुमच्या अभिप्रायाने खरचं प्रोत्साहन मिळाले.
आनी स्मितही उमटले, वाचक म्हणुन जागलात, मी लेखक म्हणुन निश्चीत झोपणार नाही.
हा हा हा हा...
येईन थोड्याच वेळात परत..लोभ असु द्यावा.

8:57 PM  

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>