Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: व्वा सलमान व्वा !!!

Tuesday, April 11, 2006

व्वा सलमान व्वा !!!

हि एक बातमी....

चिंकारा शिकार प्रकरणी सलमानला पाच वर्षे कैद
जोधपूर, ता. १० - चिंकाराच्या शिकार प्रकरणी प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला येथील न्यायालयाने आज पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्याला अटक करण्यात आली असून, येथील मध्यवर्ती तुरुंगात त्याची रवानगी करण्यात आली.


आणी हा त्या बातमीचा परिणाम........!!!!!!


सलमानला झालेल्या शिक्षेची बातमी ऐकून त्याची आई सलमा ह्यांना मानसिक धक्का. लिलावटी मध्ये दाखल.

आणखी एक बातमी.....

सलमान खानची 'लँड क्रूझर' गाडी 28 सप्टेंबर 2002 च्या मध्यरात्री वांद्यात भरधाव धावत असताना एका बेकरीसमोरच्या फुटपाथवर घुसली. रस्त्यावर झोपलेल्या नूरुल्ला महबूब शरीफ या वृद्धाचा मृत्यू ओढवला, तर 17 वर्षांचा अद्बुल र‌ऊफ शेख जबर जखमी झाला. आणखी दोघे-कलीम मोहम्मद पठाण आणि मुन्ना मला‌ई खान- जखमी झाले. बेधुंद ड्रायव्हिंगबद्दल सलमानला पोलिसांनी पकडले खरे; पण रातोरात केवळ भरधाव गाडी चालवल्याबद्दलचा दंड भरून सलमान सुटलादेखील!

आता माझ्या भाबड्या मनाला पडलेले तेवढेच भाबडे प्रश्न....
१) काय प्रसंग ओढवला असेल त्या मयताच्या कुटुंबीयांवर???
२) जखमींच्या घरच्यांचे काय?
३) त्यांना जो मानसिक धक्का बसला असेल त्यावर मिळाले असतील त्यांना उपचार, लिलावटीचे सोडाच पण एकाद्या छोट्या रुग्णालयात तरी??

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>