Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: माझी चरित्रकथा...!!! वाचकांच्या प्रतिक्रीया.

Wednesday, March 15, 2006

माझी चरित्रकथा...!!! वाचकांच्या प्रतिक्रीया.

सप्रेम नमस्कार,
वेळात वेळ काढुन आपली प्रस्तावना वाचली. खरच मनाला भिडणारी व वास्तववादी वाटली. माझाही अनुभव तुमच्या सारखाच आहे. मी ही नवकवियत्री होते. पण कवियत्री होण्याआधीच कंरट्या लोकाच्या टिकेला कंटाळून ह्या क्षेत्राला राम राम ठोकला. माझ्या कविता खुपच गहन आशयाच्या असायच्या. संदर्भासाठी माझी एक कविता ईथे देत आहे.
तु एक पक्षी
अनं मी एक
तुझी नजर क्षितिजापल्याड
माझी आसमंतात
दुर एक कावळा
जसा शिवाजीचा मावळा....
अश्या गहन कवितेची सुद्धा ते टिंगल उडवायचे. ह्या लोकांची बौद्धीक पातळीच कमी पडली तर मी तर काय करु? कॄपया तुमचा पत्ता द्याल का? मी तुम्हाला त्याचा अर्थ समजावुन देईन. ज्यास्त नाही ३-४ तासात उरकेल.
आता हल्ली मी गाणे शिकतेय. माझा प्रियकर म्हणतो की मी प्रती लतादिदी होवु शकते. ह्याला म्हणतात जाणकाराची नजर. नजर ह्यासाठी म्हणत्येय की तो एकाच कानाने बहिरा आहे. दुसऱ्या कानाला श्रवणयंत्र लावले की त्याला माझे गायन ऐकु येते. नाही तर आमच्या शेजारच्या मालतीबाई, म्हणतात की असे रात्री अपरात्री नका हो रियाझ करत जावु. आमचा बंडु दचकुन जागा होतो. पण मी न डगमगता माझी गायन साधना सुरुच ठेवली आहे. फक्त तुमचा कृपा असु द्यावी. आत्ताच कुठे संगीत क्षेत्रात एक तारका निर्माण होते आहे.
आपली
एम.एच.के. नंदिता लक्ष्मी
**********************************
आम्ही रद्दी विकत घेतो व विकतो.
रद्दीचा भाव त्याच्या वजनावर ठरवला जातो, त्यात काय छापले/लिहीले आहे, ह्यावर नाही. तसेच घराला ध्वनी प्रतिबंधक प्लॅस्टर करुन देतो.
आमची इतरत्र कोठेही शाखा नाही, नागपुरात ही नाही.
रद्दीवाले सहस्त्रबुद्धे,
मराठी साहित्य सभेमागे,
पुणे.

*********************************************************************
कसले फालतु लिखाण आहे. आज काल कोणी ही उठला कि लागला लिहायला. त्याला ना चव, ना चोथा. म्हणे वास्तवादी लिखाण आहे! लेखक बहुदा १७ व्या शतकातला असावा? आता आधुनिक स्त्रि स्वतंत्र झाली आहे. चुल आणी मुल ह्या चाकोरीतुन केंव्हाच बाहेर पडली आहे, ह्याचा कदाचीत लेखक महाशयाला पत्ताच नसावा.
माझेच उदाहरण घ्या ना. माझ्या माहेरी स्वयंपाकी होता. त्यामुळे स्वयपाक वगेरे शिकायची गरज पडली ही नाही आणी वाटली नाही. संदिप म्हणजे माझा मिस्टर Software Engineer आहे. चांगल्या MNC Call Center मध्ये आहे. आणी मी किनई समाज सेवेला वाहुन घेतले आहे. तो ऑफिस मधुन येतानाच २ बिर्यानी, २ बर्गर व १-२ पिझ्झा घेवुन येतो. डायट पेप्सी आणायलाही विसरत नाही. मग आम्ही दुरदर्शन वर मेळघाटातील भुकबळी ह्यावरचा वृतांत पहात फस्त करतो. मग कशाला गरज रेसीपी व चवीची काळजी करण्याची?
आता राहिला प्रश्न मुलांचा, पाळणाघरे कशासाठी आहेत? चला निघते मी आता. खुपच बिझी आहे. पार्लर मध्ये जायचे आहे, मेक अप करुन एकाच्या अंत्यविधीला जायचे आहे. हे संपते ना संपते तर लागलीच "बाळाचे संगोपन व सकस आहार" वर व्याख्यान देणे आहे. नंतर भजनी मंडळात जावुन एका भजनाला "आशिक बनाया आपने"ची चाल लावायची आहे. समाजसेवे सोबतच अध्यात्माचीही जोड.
तर सांगायचा मुद्दा हाच कि आजची स्त्री बदलली आहे. पुर्वी सारखी अबला नाही राहीली. मी तर पुढे जावुन म्हणेन कि ती स्त्रिच राहीली नाही.(अरे बाप रे).
आपली
सुकन्या सदाफुले.
थोर समाज सेविका.
शाखाध्यक्ष: नारी मुक्ती मंच
तिसरी गल्ली, चौथे बोळ,
५,६,७, घर शाखा.
हिंजवडी.
****************************************************************************
माननीय लेखक महोदय, प्रथम सर्व सामान्य विवाहीत पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडल्या बद्दल आभार. तुम्ही काय आम्ही काय समदुखीच हो. माझी पत्नी ही असेच पाक कलेची पुस्तके वाचुन नविन नविन प्रयोग करुन माझ्या पोटाची शब्दश: प्रयोगशाळा करुन टाकली होती हो. म्हणुन मीच स्वयपाक करायला शिकलो.
आता पोष्टातल्या सेवेतुन निवृत होवुन खानावळ चालु केली आहे. अगदी घराच्या सारखे जेवन मिळते आमच्याकडे. घराच्या सारखे जेवन म्हंटल्यावर घाबरलात कि काय? म्हणजे भातात खडे व जेवनात केस, कच्च्या पोळ्या व खारट वरण नसते हो. अगदा अनुभव घ्या. मित्रांनाही सांगा. तुमच्या सोबत तुम्ही ३ लोक आणले तर तुमच्या थाळीचे पैसे माफ. पत्ता निट लक्षात ठेवा हं.
आपला
प्रो. अन्न पुरना भोजनग्रह

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>