Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: माझी चरित्रकथा!!!

Saturday, March 11, 2006

माझी चरित्रकथा!!!

प्रस्तावना.(पुढे चालु)

आलो बाबा एकादाचा दोन घास पोटात घालुन. मला खरच कौतुक वाटते कि ज्या लोकांनी " उदरभरण नोहे जे जाणिजे यज्ञकर्म" म्हणुन ठेवले आहे, त्यांचे. आमच्या घरात ते तंतोतंत लागु होते. कधीतरी पोटभर ताव मारावा म्हंटले की स्वंयपाक घरात हिचे पाक कलेचे विचित्र प्रकारांचे प्रात्याक्षिके चालु असतात. आणी यज्ञात जशाप्रकारे कशाचीही आहुती दिले जाते अगदी तशीच काहीही माझ्या पोटात ढकलावे लागते. सुरुवातीला जेंव्हा ती मला आधी जेवायला बसवायची आणी माझे जेवण होईपर्यंत समोरच बसून एकटक माझ्याकडे पहात रहायची. मला वाटायचे माझ्या वरच्या प्रेमापोटी ति हे सगळे करतेय. पण आता अनुभवाने हळुहळु माझ्या लक्षात आले.( पॉईंट नोट किया जाए, कि लेखक अनुभव संपन्नही आहे.) ह्यात तिचा दुहेरी डाव असायचा. आता तुम्हीच मला सांगा, शेळीपुढे गवत टाकायचे आणी समोर वाघाचे चित्र लावायचे, कशी खाईल शेळी ते गवत मनमोकळेपणाने. समजा धाडस करुन खाल्लेच तर पचनार का हो? आणी दुसरा म्हणजे नविन औषधांची जशी प्रथम चाचणी कुत्र्या-मांजावर घेतात आणी यशस्वी झालेच तर मग मनुष्यप्रांण्यावर आजमावतात. तसेच ति करत असावी कारण मी जेवल्यानंतर एक-दिड तासाने ती जेवायची. माझ्यावर काय परिणाम होतो ते पाहुनच ती निर्णय घेत असावी. असो विषयांतर टाळुन मुळ मुद्यावर येवु या.
तर आपला विषय चालला होता विश्लेषणाचा. प्रथमच सांगितल्या प्रमाने ह्या चरित्रकथेत सर्व विषयांचा समावेश असेल. आता सुरुवातीचाच परिच्छेद पहा. मी हे अर्पण करतो आहे म्हणजे लिनता, शालिनता, नम्रता(शिरोडकर नव्हे) आहे. प्रसुतिवेदना म्हणजे स्वता न अनुभवता ही लिहु शकतो म्हणजे कल्पकता आहे. सहनशिलता आहे. आणी त्यानंतर मिळणारा आनंद म्हणजे निराशेतही आशेचा किरण आहे. तशी माझ्या विचारशक्तीला खोली आहे. एका महान विचारवंतानी(मी नव्हे) म्हंटलेलेच आहे कि कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवावयाचे असेल तर त्याच्या खोलात गेले पाहिजे.
आता ईथे पोहायला शिकणाऱ्याने काय केले पाहिजे असा वायफट प्रश्न विचारणे उचित नव्हे. सांगायचा मुद्द हाच कि माझ्या विचारांना जशी खोली आहे ( संदर्भ: गेले खड्ड्यात तुमचे विचार, इति: धर्मपत्नी) तशी उत्तुंग उंची ही आहे. कधी कधी विचारांच्या उंचीची माझी मलाच भिती वाटते. विचार काहीवेळेस इतके उंचावर जातात की वाटते खाली येताना एकादया एअर होस्टेसलाच बरोबर घेवुन येतात की काय? बरे ती एअर होस्टेस सामान्य असली तर ठिक, नाहीतर `जमीन' मधल्या बिपाशा बसु सारखी असली म्हणजे एकेकडुन जॉन अब्राहम व दुसरी कडुन अमरसिंह म्हणजे माझी काही धडगत नाही.
( क्रमश)

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>