आता खोटेपणाचाही परमावधी !!!
महापालिकेच्या शाळेतल्या गणप्याने कालही शाळेला बुट्टी मारली. आज शाळेत आल्या आल्या जोशी मास्तरांनी फैलावर घेत विचारले.
" का रे गणप्या, काल का नाही आला शाळेला?"
खाली मुंडी घालुन हळुच आवाजात गणप्या उत्तरला,
" काल माझा बा मेला"
हे ऐकुन मास्तरांचा संताप अनावर झाला.
" प्रत्येक वेळेस गणप्या तु माय मेली, कधी बा मेला म्हणतोस. किती वेळा असे किती दिवस खोटे बोलणार रे तु?"
"म्या खोटं नाही बोलत मास्तर, तुमच्या गळ्याची आन घेवुन सांगतोय. माझा बाप मेला कि माय दुसर लगीन करतीया अन माय मेली कि बा दुसरी माय आणतुया. ह्यात माझ्या शिक्षणाचा बोऱ्या वाजतुया. आता म्या तरी काय करणार? "

0 Comments:
Post a Comment
<< Home