Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: म्हणींची सर मिसळ...

Saturday, May 06, 2006

म्हणींची सर मिसळ...

एक विद्यार्थी ४ च्या परिक्षेची तयारी न करताच पेपरला आला. आपल्या असामान्य सामान्यज्ञानाच्या जोरावर त्याने अर्धवट म्हणीं कशा पुर्ण केल्या, त्या पहा....


सुरवातीला योग्य म्हण व त्याखाली त्याने पुर्ण केलेली म्हण.


नाचता येइना आंगण वाकडे.
नाचता येइना.....कुत्रा आवर.

नांव सोनुबाई अन हाती कथळाचा वाळा.
नांव सोनुबाई अन......वडापाव शिवाय खात नाही.

देव देते अन कर्म नेते.
देव देते...हाती कथळाचा वाळा.

भटाला दिली ओसरी, भट हळू हळू पाय पसरी.
भटाला दिली ओसरी,.....तर जमतील भुते.

आपला हात जगन्नाथ
आपला हात.....गुळाची चव काय?

कुठेही जा, पळसाला पाने तिनच.
कुठेही जा,....देईना कुणी मुका.

घरोघरी मातीच्याच चुली.
घरोघरी..भट हळू हळू पाय पसरी.

अडला हरी गाढवाचे पाय धरी.
अडला हरी.....भट हळू हळू पाय पसरी.

ढवळ्या शेजारी पवळा बांधला
वाण नाही पण गुण लागला.

ढवळ्या शेजारी पवळा बांधला....तर डर कशाला?

साडी नेली बाईंन अन चिंधी नेली गायीनं.
साडी नेली बाईंन...अन चांभार पोरं मारी.

बोले तैसा चाले....त्याचे आंगण वाकडे.

असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
असेल हरी तर.....पण कुत्रा आवर

कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात.
कावळ्याच्या शापाने.... चार दिवस सुनेचे.

बैल गेला अन झोपाळा केला.
बैल गेला अन...गायी मरत नसतात

हत्ती गेला अन शेपुट राहिलं.
हत्ती गेला....त्याला कोण रडे?

ऊस गोड लागला म्हणून मुळांपासुन खावू नये.
ऊस गोड लागला म्हणून....झोपाळा केला.

करुन करुन दमला अन देव पुजेला लागला.
करुन करुन दमला....त्याची वंदावी पाऊले.

मनी वसे ते स्वप्नी दिसे.
मनी वसे ते...कर्म नेते.

आयजीच्या जिवावर बायजी उदार.
आयजीच्या जिवावर बायजी.....गाढवाचे पाय धरी.

हलवायाच्या घरावर तुळशीपत्रं.
हलवायाच्या घरावर.....भाराभर चिंध्या.

म्हतारी मेल्याच दुख: नाही पण काळ सोकवतोय.
म्हतारी मेल्याच दुख: नाही....घाल कुत्र्याला.

जावयाच पोरं हरामखोर.
जावयाच पोरं.....केरात.

सासरच्या जिवावर जावाई सुभेदार.
सासरच्या जिवावर.....गाढव चाललं भुकत.

दुष्काळात तेरावा महिना.
दुष्काळात....वैद्य मरो.

आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार?
आडातच....जगन्नाथ.

आत्याबाईला मिशा आसत्या तर काका नसते का म्हट्ले?
आत्याबाईला मिशा आसत्या तर....पोहऱ्यात कोठून येणार?

चोराच्या हाती द्याव पन पोराच्या हाती नाही.
चोराच्या हाती....आरसा कशाला?

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.
नकटीच्या लग्नाला.....व्याह्यांन धाडलं घोड.

स्वत: मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही.
स्वत: मेल्या शिवाय...भांडे कशाला लपवायचे?

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>