Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: तनसे तन का मिलन.......

Saturday, May 13, 2006

तनसे तन का मिलन.......

मागच्या आठवड्यात एक बातमी "आज तक" वर पाहीली. एका मुस्लीम युवतीने आपला प्रियकर दुसऱ्या बाईशी लग्न करतोय म्हणून गोळ्या झाडून त्याला यमसदनी पाठवले.
आणी कालच आणखी एक पाहीले. हरदोई इथे प्रियकर स्वताच प्रेयसीच्या विवाहात मानवी बॉंबच्या रुपात स्फोट घडवून हाहाकार माजवला.
मन अगदी सुन्न झाले ते बघून. म्हणे प्रेमासाठी हे केले. हे करण्यामागे कसली आली प्रेम भावना. प्रेम एवढे क्रुर बनवते? नसेल येवु शकले ते एकत्र, काही मर्यादा मुळे, सामाजिक बंधनामुळे म्हणा. आपला प्रियकर / आपली प्रेयसी कायमचे आपले नाही झाले तर आपण जिव लावला त्याचाच जिव घ्यायचा? का त्यांचे प्रेम एवढा सुध्दा त्याग करणे नाही शिकवू शकले?
आजकाल प्रेम म्हणजे एक फॅड झाले आहे.
सोमवारी प्रेम बसते न बसते तो शनिवार पर्यंत ह्यांचा प्रेमभंग ही झालेला असतो. मग सुरु होते सुडाची कहाणी. एक तर देवदास बनुन कोणत्याना कोणत्या व्यसनाच्या आहारी जाणे किंवा मग स्वताच्या नाहीतर दुसऱ्याच्या जिवावर उठणे??
बाबांनो प्रेम एवढे सोपी किंवा थिल्लर गोष्ट नव्हे नाही हो. जर असे असले असते तर जनावरात व माणसांत काहीच फरक नाही का? सगळ्यांनाच प्रेमात नाही यश येत, मग प्रेमाची व्याख्याच बदलते की काय? जिवन म्हणजे चित्रपट नव्हे? सगळेच थोड्याच वेळात निर्माण व्हायला व संपायला देखील.
तुमचे आणी आमचे सेम नसले तरी शेवटी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असते ना??
यावेळी आठवतात त्या पुढील ओळी..
तन से तन का मिलन होना पाया तो क्या?
मन से मन का मिलन कोई कम तो नही..
चांद मिलता नही सबको संसार में
एक दिया ही बहोत है रोशनीके लिये
मग जितक्या वेळ एकमेकांच्या सोबतीत उपभोगलेल्या सोनेरी क्षणांच्या आठवणींच्या रोशनीत उरलेले आयुष्य काढणे शक्यच नाही का? का करायलाच पाहीजे प्रेमाला बदनाम? का करावीशी वाटते मग स्वतासोबतच दुसऱ्यांच्याही आयुष्याची बरबादी?? ह्यामुळे कांही साध्य होत असए नाहीच पण प्रेम मात्र कलंकित होते.

2 Comments:

Anonymous Anonymous said...

Have you gone through a heart break of true love? I wish you haven't, but you would understand if you have, how painful it is. Different people react to pain differently depending upon the severity. I am not justifying anything, but it is true that some people are too weak to deal with the pain.

9:36 AM  
Blogger दिलीप कुलकर्णी said...

प्रथम तुमचे आभार, एक तर वाचण्यासाठी वेळ दिलात व दुसरे म्हणजे आपले मत ही नोंदवले.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. मान्य आहे कि प्रेमात असे अनेक क्षण येतात कि आपल्या सहनशिलतेचा अंत पाहिला जातो. कधी कधी वाटते हे आपल्याच नशिबी का आले? आपणच जगात सर्वात ज्यास्त दुर्देवी आहोत कि काय?
प्रेम त्यागाचे दुसरे रुप आहे. घेण्यापेक्षा देण्यात सुख आहे. ति एक पवित्र भावना आहे. हा काही धंदा नव्हे फायदा-तोट्याचा हिशोब करायला? शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न म्हणुन सोडणे अपरिहार्यच ठरते.

12:10 AM  

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>