Wednesday, March 29, 2006
Wednesday, March 15, 2006
माझी चरित्रकथा...!!! वाचकांच्या प्रतिक्रीया.
सप्रेम नमस्कार,
वेळात वेळ काढुन आपली प्रस्तावना वाचली. खरच मनाला भिडणारी व वास्तववादी वाटली. माझाही अनुभव तुमच्या सारखाच आहे. मी ही नवकवियत्री होते. पण कवियत्री होण्याआधीच कंरट्या लोकाच्या टिकेला कंटाळून ह्या क्षेत्राला राम राम ठोकला. माझ्या कविता खुपच गहन आशयाच्या असायच्या. संदर्भासाठी माझी एक कविता ईथे देत आहे.
तु एक पक्षी
अनं मी एक
तुझी नजर क्षितिजापल्याड
माझी आसमंतात
दुर एक कावळा
जसा शिवाजीचा मावळा....
अश्या गहन कवितेची सुद्धा ते टिंगल उडवायचे. ह्या लोकांची बौद्धीक पातळीच कमी पडली तर मी तर काय करु? कॄपया तुमचा पत्ता द्याल का? मी तुम्हाला त्याचा अर्थ समजावुन देईन. ज्यास्त नाही ३-४ तासात उरकेल.
आता हल्ली मी गाणे शिकतेय. माझा प्रियकर म्हणतो की मी प्रती लतादिदी होवु शकते. ह्याला म्हणतात जाणकाराची नजर. नजर ह्यासाठी म्हणत्येय की तो एकाच कानाने बहिरा आहे. दुसऱ्या कानाला श्रवणयंत्र लावले की त्याला माझे गायन ऐकु येते. नाही तर आमच्या शेजारच्या मालतीबाई, म्हणतात की असे रात्री अपरात्री नका हो रियाझ करत जावु. आमचा बंडु दचकुन जागा होतो. पण मी न डगमगता माझी गायन साधना सुरुच ठेवली आहे. फक्त तुमचा कृपा असु द्यावी. आत्ताच कुठे संगीत क्षेत्रात एक तारका निर्माण होते आहे.
आपली
एम.एच.के. नंदिता लक्ष्मी
**********************************
आम्ही रद्दी विकत घेतो व विकतो.
रद्दीचा भाव त्याच्या वजनावर ठरवला जातो, त्यात काय छापले/लिहीले आहे, ह्यावर नाही. तसेच घराला ध्वनी प्रतिबंधक प्लॅस्टर करुन देतो.
आमची इतरत्र कोठेही शाखा नाही, नागपुरात ही नाही.
रद्दीवाले सहस्त्रबुद्धे,
मराठी साहित्य सभेमागे,
पुणे.
*********************************************************************
कसले फालतु लिखाण आहे. आज काल कोणी ही उठला कि लागला लिहायला. त्याला ना चव, ना चोथा. म्हणे वास्तवादी लिखाण आहे! लेखक बहुदा १७ व्या शतकातला असावा? आता आधुनिक स्त्रि स्वतंत्र झाली आहे. चुल आणी मुल ह्या चाकोरीतुन केंव्हाच बाहेर पडली आहे, ह्याचा कदाचीत लेखक महाशयाला पत्ताच नसावा.
माझेच उदाहरण घ्या ना. माझ्या माहेरी स्वयंपाकी होता. त्यामुळे स्वयपाक वगेरे शिकायची गरज पडली ही नाही आणी वाटली नाही. संदिप म्हणजे माझा मिस्टर Software Engineer आहे. चांगल्या MNC Call Center मध्ये आहे. आणी मी किनई समाज सेवेला वाहुन घेतले आहे. तो ऑफिस मधुन येतानाच २ बिर्यानी, २ बर्गर व १-२ पिझ्झा घेवुन येतो. डायट पेप्सी आणायलाही विसरत नाही. मग आम्ही दुरदर्शन वर मेळघाटातील भुकबळी ह्यावरचा वृतांत पहात फस्त करतो. मग कशाला गरज रेसीपी व चवीची काळजी करण्याची?
आता राहिला प्रश्न मुलांचा, पाळणाघरे कशासाठी आहेत? चला निघते मी आता. खुपच बिझी आहे. पार्लर मध्ये जायचे आहे, मेक अप करुन एकाच्या अंत्यविधीला जायचे आहे. हे संपते ना संपते तर लागलीच "बाळाचे संगोपन व सकस आहार" वर व्याख्यान देणे आहे. नंतर भजनी मंडळात जावुन एका भजनाला "आशिक बनाया आपने"ची चाल लावायची आहे. समाजसेवे सोबतच अध्यात्माचीही जोड.
तर सांगायचा मुद्दा हाच कि आजची स्त्री बदलली आहे. पुर्वी सारखी अबला नाही राहीली. मी तर पुढे जावुन म्हणेन कि ती स्त्रिच राहीली नाही.(अरे बाप रे).
आपली
सुकन्या सदाफुले.
थोर समाज सेविका.
शाखाध्यक्ष: नारी मुक्ती मंच
तिसरी गल्ली, चौथे बोळ,
५,६,७, घर शाखा.
हिंजवडी.
****************************************************************************
माननीय लेखक महोदय, प्रथम सर्व सामान्य विवाहीत पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडल्या बद्दल आभार. तुम्ही काय आम्ही काय समदुखीच हो. माझी पत्नी ही असेच पाक कलेची पुस्तके वाचुन नविन नविन प्रयोग करुन माझ्या पोटाची शब्दश: प्रयोगशाळा करुन टाकली होती हो. म्हणुन मीच स्वयपाक करायला शिकलो.
आता पोष्टातल्या सेवेतुन निवृत होवुन खानावळ चालु केली आहे. अगदी घराच्या सारखे जेवन मिळते आमच्याकडे. घराच्या सारखे जेवन म्हंटल्यावर घाबरलात कि काय? म्हणजे भातात खडे व जेवनात केस, कच्च्या पोळ्या व खारट वरण नसते हो. अगदा अनुभव घ्या. मित्रांनाही सांगा. तुमच्या सोबत तुम्ही ३ लोक आणले तर तुमच्या थाळीचे पैसे माफ. पत्ता निट लक्षात ठेवा हं.
आपला
प्रो. अन्न पुरना भोजनग्रह

पंजाब बोर्डाची कॉलेजपरीक्षा
(महाराष्ट्र टाईम्स च्या सौजन्याने)
सूचना ...
1. सगळ्या प्रश्नांना मार्क आहेत.
2. आपल्याच डोक्याने प्रश्न सोडवा.
3. परीक्षा हॉलमध्ये झोपण्यास बंदी.
4. परीक्षा सुरू असताना दारू पिण्यास बंदी आहे.
5. शस्त्रे बाळगण्यास बंदी आहे.
.........................................................................
प्रश्नपत्रिका
1. आपले संपूर्ण नाव नीट आठवून लिहा. (वेळ 20 मिनिटे)
पुढील प्रत्येक प्रश्नासमोरील योग्य उत्तराशेजारच्या कंसात बरोबरची खूण करा. (उरलेल्यांमध्ये फुली मारण्यात वेळ घालवू नका.)
2 . सेक्स? :
() पुरुष () स्त्री () सरदार () अधूनमधून
3. वय :
() शून्यापेक्षा कमी () शून्य () शून्यापेक्षा जास्त
4.2+2 किती होतात?
() चार () 4 () 3+1
5. तुम्हाला एक भाऊ असेल, तर त्याला किती भाऊ आहेत?
() एकही नाही () सहा () प्रश्न अतिवैयक्तिक आहे
6. एखाद्याने तुम्हाला 100 पैशांच्या बदल्यात एक रुपया दिला, तुमच्याकडे काय आहे?
() एक रुपया () 100 पैसे () काहीही नाही
7.' मी' या विषयावर तीन वाक्यांचा निबंध लिहा.
( उदाहरणार्थ : माझे नाव .... आहे. (प्र. 1 मध्ये दिलेले नाव लिहावे). मी मुलगा/ मुलगी आहे. मी निबंध लिहीत आहे.)
8. अ=ब असेल आणि ब=क असेल, तर अ=क हे काय आहे?
() बरोबर () चूक () अभ्यासक्रमाबाहेरचे
9. तुम्ही लंचच्या वेळी लंच जेवता, तर डिनरच्या वेळी काय जेवता?
() लंच () ब्रेकफास्ट () डिनर () तुम्ही फक्त एक वेळच जेवता
10. या प्रश्नाचा क्रमांक किती आहे?
() 1 ()20 ()3 () मोजता येत नाही
11. जर 2+3= 5 असेल, तर 3+2= 5 हे काय आहे?
() अशक्य () कॅल्क्युलेटर विसरलो
12. चंदावर पहिले पाऊल ठेवलेल्या माणसाचे नाव काय होते?
() नील आर्मस्ट्राँग () नील आर्मस्ट्राँग () नील आर्मस्ट्राँग
13. तुम्हाला एकाच हाताची बोटे वापरून पाचापेक्षा मोठा आकडा मोजता येतो का?
() हो () नाही

Monday, March 13, 2006
प्रस्तावना
(पुढे चालु)
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. असे भगवंतानी म्हंटलेलेच आहे. माझ्या बाबतीत हे लागु होते पण ५० टक्केच. आणी ही टक्केवारी काही वाढयची शक्यता नाही. माझ्या मागे स्त्री आहे पण अजुन मी यशस्वी झालो नाही. बरे माझ्या मागे जी स्त्री आहे तिच्यामुळे यशस्वी होण्याची शक्यताच नाही. ही माझ्या मागे आहे म्हणजे खरोखरच आहे हो, अगदी हात धुवून वगेरे म्हणतात ना तसे. लिखाणाला प्रोत्साहन दयायचे वगेरे सोडाच पण वरतून दरडावते कि असले रिकामटेकडे उद्योग तुंम्हाला सुचतातच कसे? आणी अशा गोष्टीसाठी नविन वह्या बाजारातुन आणुन काळ्या करत बसायची गरज नाही. ऑफिसातुन रुलींग पेपर आणुन त्यावर खरडत जा. जमले तर जमले नाहीतर दुसऱ्यादिवशी सकाळी आपल्या बंडु साठी उपयोगी पडतील. बर काहीतरी रागावून गप्प बसवावे म्हंटले तर वरुन ऎकावे लागते की पुराण काळा पासुनच स्त्रिंयाची मुस्कटदाबी होत आलेली आहे. पण आता स्त्री जागी झालेली आहे. (नशिब माझे आता तरी हिला जाग आली.)
मला आठवते सासरी पाठवताना हिचा बाप खुपच रडत होता. मी म्हणालो एवढी चिंता नका करु तुम्ही. मी तिला चांगली संभाळीन. त्यावर सासरे धिरगंभीर होत म्हणाले, " मला तिची चिंता नाही वाटत हो. तुम्ही स्वताला संभाळले म्हणजे खुप झाले. पोरगी अगदी आईच्या वळणावर गेली आहे." यावर मी नसलेली छाती फुगवण्याचा प्रयत्न करुन म्हणालो होतो " बघा मी तिला कशी ठिक करतो ते?" आता इतक्या वर्षाने मागे वळुन पहातो तर मी तिला ठिक करायचे सोडाच पण तिने मात्र मलाच ठिक ठाक केले आहे.
जावु द्या, असे रडगाणे कशाला गायचे? प्रतिकुल परिस्थितीवरही जो मात करुन आपली प्रतिभा जोपासतो तोच खरा मनस्वी कलावंत.( वा: वा:) एकदा का माझी चरित्रकथा पुर्ण झाली आनं माझी भटकंती प्रकाशकाच्या शोधात निघाली. सापडलाही एक नव प्रकाशक. संपुर्ण वाचल्या नंतर त्याने निरोप दिला की आमच्या म्हणजे त्यांच्या सौभाग्यकांक्षिणीचे मत घेणे गरजेचे आहे.
मला त्यांचा स्त्री आदर, त्यांना निर्णयात सामावुन घेणे वगेरेचा विचार खुपच कौतुकास्पद वाटला. नंतर मात्र कळाले कि छापखाना टाकण्यासाठी त्यांच्या सासरेबुवांनी भांडवल दिले आहे आनं त्यांच्या पत्नीचे मते ( सगल्याच पत्नींचे मत असेच असते म्हणा!) हे अगदीच बावळट आहेत, कोणीही ह्यांना सहज फसवु शकते. त्यामुळे तिच्या नजरे खालुनच सगळे व्यवहार गेले पाहिजेत. शेवटी त्यांचाही होकार मिळाला. एका प्रतिभावंताची दुसऱ्या प्रतिभावंताला दिलेला प्रतिसाद होता तो! शेवटी हिऱ्याची पारख करण्यासाठी रत्नपारखाचीच नजर असावी लागते हेच खरे! आता त्यांच्या तिच्या LLTT(Looking Londan Talking Tokeyo) इथे काही संबध नाही.
आता प्रस्तावना संपत आली आहे. ( कोणी सोडला हो दिर्घ सुस्कारा?) माझ्या नवलेखकाच्या प्रस्तावनेला रसिक वाचकांचा कसा प्रतिसाद मिळतो ह्यावरच पुढची वाटचाल अवलंबुन आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या आधीचा माझा अनुभव म्हणावा तितकासा चांगला नाही. ह्या आधी मी कविता ही केल्या होत्या. एका नवकवी संमेलनात काव्य वाचनाची संधी ही मिळाली होती. पहिल्या कवितेचे कौतुक झाले म्हणुन दुसरी वाचायला घेतली तेव्हा रसिकांनी घडयाळावर नजर फिरवायला चालु केली. काही महाभागांनी तर घडयाळ हलवुन हलवुन ते चालु आहे का ह्याची खात्री करुन घेतली. काय करंटेपणा म्हणायचा हा? तरी मी त्याकडे दुर्लक्ष करुन आपले काव्य वाचन पुढे चालुच ठेवले होते. माझ्या कवितेतला गर्भार्थ त्यांना आकलन नाही झाला ह्यात माझा काय दोष? नसते एकाद्यापाशी एवढी कुवत! एकदा कमल हसन चा `पुष्पक' नावाचा सिनेमा पहायला गेलो होतो. तो चालु होवुन २०-२५ मिनीटे झाली असतील नसतील, तर एक जोडपे उठुन घरी जायला निघाले. का तर ति बाई तिच्या नवऱ्याला म्हणाली "ह्या सिनेमा मुक बधीर लोकांसाठी दिसतोय, आपण उगीचच आलो." कहर म्हणजे जाता जाता एक कुत्सित कटाक्ष आमच्या सौ. वर टाकुन गेली. ते गेले खरे पण आमच्या हिला तु मुक-बधिर नाहीस हे समजवता समजवता माझा पुढचा अख्खा आठवडा सार्थकी लागला. इथे प्रस्तावना समाप्त होत आहे. बोला "पुंडलीक वरदा हरि विठ्ठल!!!"

Saturday, March 11, 2006
माझी चरित्रकथा!!!
प्रस्तावना.(पुढे चालु)
आलो बाबा एकादाचा दोन घास पोटात घालुन. मला खरच कौतुक वाटते कि ज्या लोकांनी " उदरभरण नोहे जे जाणिजे यज्ञकर्म" म्हणुन ठेवले आहे, त्यांचे. आमच्या घरात ते तंतोतंत लागु होते. कधीतरी पोटभर ताव मारावा म्हंटले की स्वंयपाक घरात हिचे पाक कलेचे विचित्र प्रकारांचे प्रात्याक्षिके चालु असतात. आणी यज्ञात जशाप्रकारे कशाचीही आहुती दिले जाते अगदी तशीच काहीही माझ्या पोटात ढकलावे लागते. सुरुवातीला जेंव्हा ती मला आधी जेवायला बसवायची आणी माझे जेवण होईपर्यंत समोरच बसून एकटक माझ्याकडे पहात रहायची. मला वाटायचे माझ्या वरच्या प्रेमापोटी ति हे सगळे करतेय. पण आता अनुभवाने हळुहळु माझ्या लक्षात आले.( पॉईंट नोट किया जाए, कि लेखक अनुभव संपन्नही आहे.) ह्यात तिचा दुहेरी डाव असायचा. आता तुम्हीच मला सांगा, शेळीपुढे गवत टाकायचे आणी समोर वाघाचे चित्र लावायचे, कशी खाईल शेळी ते गवत मनमोकळेपणाने. समजा धाडस करुन खाल्लेच तर पचनार का हो? आणी दुसरा म्हणजे नविन औषधांची जशी प्रथम चाचणी कुत्र्या-मांजावर घेतात आणी यशस्वी झालेच तर मग मनुष्यप्रांण्यावर आजमावतात. तसेच ति करत असावी कारण मी जेवल्यानंतर एक-दिड तासाने ती जेवायची. माझ्यावर काय परिणाम होतो ते पाहुनच ती निर्णय घेत असावी. असो विषयांतर टाळुन मुळ मुद्यावर येवु या.
तर आपला विषय चालला होता विश्लेषणाचा. प्रथमच सांगितल्या प्रमाने ह्या चरित्रकथेत सर्व विषयांचा समावेश असेल. आता सुरुवातीचाच परिच्छेद पहा. मी हे अर्पण करतो आहे म्हणजे लिनता, शालिनता, नम्रता(शिरोडकर नव्हे) आहे. प्रसुतिवेदना म्हणजे स्वता न अनुभवता ही लिहु शकतो म्हणजे कल्पकता आहे. सहनशिलता आहे. आणी त्यानंतर मिळणारा आनंद म्हणजे निराशेतही आशेचा किरण आहे. तशी माझ्या विचारशक्तीला खोली आहे. एका महान विचारवंतानी(मी नव्हे) म्हंटलेलेच आहे कि कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवावयाचे असेल तर त्याच्या खोलात गेले पाहिजे.
आता ईथे पोहायला शिकणाऱ्याने काय केले पाहिजे असा वायफट प्रश्न विचारणे उचित नव्हे. सांगायचा मुद्द हाच कि माझ्या विचारांना जशी खोली आहे ( संदर्भ: गेले खड्ड्यात तुमचे विचार, इति: धर्मपत्नी) तशी उत्तुंग उंची ही आहे. कधी कधी विचारांच्या उंचीची माझी मलाच भिती वाटते. विचार काहीवेळेस इतके उंचावर जातात की वाटते खाली येताना एकादया एअर होस्टेसलाच बरोबर घेवुन येतात की काय? बरे ती एअर होस्टेस सामान्य असली तर ठिक, नाहीतर `जमीन' मधल्या बिपाशा बसु सारखी असली म्हणजे एकेकडुन जॉन अब्राहम व दुसरी कडुन अमरसिंह म्हणजे माझी काही धडगत नाही.
( क्रमश)

Thursday, March 09, 2006
माझी चरित्रकथा!!!
प्रस्तावना.
तमाम मराठी रसिक हो, माझी ही चरित्रकथा तुमच्या चरणी अर्पण करताना मनापासुन आनंद होत आहे. प्रसुतिवेदना सहन केल्यानंतर बाळाचे मुखकमळ पहाताना जितका आनंद जन्म देणाऱ्या मातेला होतो त्या पेक्षाही हा आनंद मला ज्यास्त वाटतो. ( च्यायला, जमायला लागले कि आपल्याबी मोठमोठ्ठी वाक्ये लिहायला.)
सुरुवातीलाच तुमच्या ध्यानात आले असेल कि पुढे थोड्याच वेळात तुम्हांला एक परिपुर्ण, जिवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करुन जाणारी चरित्रकथा वाचायला मिळणार आहे. आता समसमा संयोग बघा कि एवढे अप्रतिम लिखाण तेवढ्याच तोडीच्या रसिक, दर्दी, जाणकारांच्या हाती पडत आहे. (सुचना: इथे तुम्हांला मी जी काही विशेषणे लावली आहेत, ते माझ्या सोयीसाठी, आता तुमची काय बिशाद आहे कि ह्या लिखाणाला फालतु म्हणण्याची? चुकून म्हणालाच तुम्ही फालतु तर सगळी विशेषणे परत काढुन टाकीन मग नंतर तुम्हीच विचार करा की तुमची वाचक म्हणुन काय लायकी, माफ करा मला पात्रता म्हणायचे होते.) आता तुमच्या डोक्यात प्रकाश पडलाच असेल की तुमची गाठ कसल्या पिंडाच्या लेखकाशी पडली आहे? वरील एकाच परिच्छेदावर नोंद घ्या की ह्यात सर्व विषयांचा समावेश असेल. मला आता ईथे थोडेसे विश्लेषण करुन सांगण्याची आवशक्यता भासत आहे. नाहीतर सगळे तुमच्या डोक्यावरुन जायचे. मी घसरत नाही म्हणालो, नाहीतर ज्याच्या डोक्यावर चंद्र विराजमान झाला आहे, त्यांना राग यायचा!! ( क्रमश: कारण बायको खेकसते आहे की जेवण गरम आहे तो पर्यंत घ्या गिळुन, परत गरम करायला मला वेळही नाही, आनं गॅसही महागला आहे. तुमच्या तुटपुंज्या पगारात कसे भागवते माझे मलाच माहित. मीच म्हणुन तुमच्याशी संसार करतेय. माझ्याजागी दुसरी कोणी असली आसती तर कधीच......(हे मात्र तिने मनातल्या मनात म्हंटले.))

Wednesday, March 08, 2006
एक विनोद Customer complain???
एकदा मालतीबाई रेल्वेने प्रवास करत होत्या. पुढच्याच स्टेशनवर एक माणुस ३ लहान मुलांसह त्यांच्याच समोरच्या सिट वर येवुन बसला.
काहीतरी बोलायचे म्हणुन त्यांनी विचारले,
"किती गोड मुले आहेत. तुमची आहेत का?"
यावर अगदीच स्थितप्रज्ञ चेहरा करुन तो म्हणाला,
"नाही हो, ही माझी मुले नाहीत. मी एका condom बनवणाऱ्या कंपनीत कामाला आहे. आणी हे आहेत.. Customer complains.

Sunday, March 05, 2006
माझ्या चारोळ्या...
तुझ्याविना....
तुझ्याविना माझी सगळी
वस्तीच बकाळ झाली..
विचार करता करता
न कळत सकाळ झाली..
प्रतिक्षा.
मरण तर कधी ना कधी येणारच आहे...
पण तु ही येशील असा विश्वास आहे !
फक्त कोण आधी येणार ते पहायचे आहे...
तसा आता माझा तुटतो श्वास आहे !!
जीवन
जीवन आणी जीणे यातले
आता कळाले अंतर...
काही तु येण्यापूर्वी....
काही तु गेल्या नंतर...!!!
वेडी आसवे
तुझ्या घरावरून जाताना
हल्ली तिकडे नजर वळत नाही...
मनाचे ठीक आहे ग
पण आसवांना काहीच कळत नाही.........
पाण्याचा एक थेंब..
पाण्याचा एक थेंब...
तो जर तव्यावर पडला तर त्याच
आस्तित्वचं संपत,
तो जर कमळाच्या पानावर पडला तर....
मोत्यासारखा चमकतो.
आणी जर शिंपल्यात पडला तर...
मोतीच होतो.
पाण्याचा थेंब तोच...
फरक फक्त सहवासाचा !!!!!!!!!
तुझ्याविना माझी सगळी
वस्तीच बकाळ झाली..
विचार करता करता
न कळत सकाळ झाली..
प्रतिक्षा.
मरण तर कधी ना कधी येणारच आहे...
पण तु ही येशील असा विश्वास आहे !
फक्त कोण आधी येणार ते पहायचे आहे...
तसा आता माझा तुटतो श्वास आहे !!
जीवन
जीवन आणी जीणे यातले
आता कळाले अंतर...
काही तु येण्यापूर्वी....
काही तु गेल्या नंतर...!!!
वेडी आसवे
तुझ्या घरावरून जाताना
हल्ली तिकडे नजर वळत नाही...
मनाचे ठीक आहे ग
पण आसवांना काहीच कळत नाही.........
पाण्याचा एक थेंब..
पाण्याचा एक थेंब...
तो जर तव्यावर पडला तर त्याच
आस्तित्वचं संपत,
तो जर कमळाच्या पानावर पडला तर....
मोत्यासारखा चमकतो.
आणी जर शिंपल्यात पडला तर...
मोतीच होतो.
पाण्याचा थेंब तोच...
फरक फक्त सहवासाचा !!!!!!!!!