Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: February 2006

Monday, February 27, 2006

रंग-रंगीली

इथे एका इंग्रजी कवितेचा मुक्त अनुवाद देत आहे. हि कविता एका आफ्रिकन नवकवीची आहे. विशेष म्हणजे २००५ सालातील उत्तम कविता या पुरस्कारसाठी ह्या कवितेला नामांकन मिळाले आहे. पहा तर त्याची विलक्षण आणी अदभुत कल्पना शक्ती.

जन्माला आलो तेंव्हा मी काळा होतो
बाळपणीही काळाच राहिलो

सुर्यप्रकाशात स्वच्छंद फिरलो
तरीही काळाच राहिलो

काही वेळेस घाबरलो, भिलो
त्यावेळेस काळाच राहिलो

खुषीतही काळाच, दुखा: मध्येही तसाच
आता मरतानाही काळाच असेन.

आणी तु...

माझी गोरी सखी,

तु जन्मली तेंव्हा गुलाबी दिसायची
अशी तुझी आई सांगते.

जस वय वाढत गेलं
तु गोरी दिसायला लागलीस

उन्हात थोडीही फिरलीस की
लाल लाल होतेस,

सर्दी झाली कि काळी-निळी पडतेस,
घाबरलीस कि पांढरी फक्क दिसतेस,

शॄंगारात हिरवी हिरवी असतेस,

रुसली रागावलीस कि लाल बुंद,

आनं मरताना कशी असशील
कल्पना नाही करवत

आणी वरुन मलाच म्हणतेस....

`तु रंग बदलत असतोस'.

` ति' सावली

संधीप्रकाशात अलग होताना

ती उदास पणे म्हणाली

वाटले मीच तुला साथ करत असेन

पण उमजले आता, साथ तुला

माझ्यापेक्षा `ति'चीच ज्यास्त

असताना अस्तित्वाने आनं

नसताना आठवणींनी

रोमा रोमाला, क्षणा क्षणाला!!!

....दिलीप

Sunday, February 26, 2006

घर-बार

व्यक्त्यांनी उपदेश सांगितला,

" संसारात घर-बार सांभाळणे हे कोणा एकट्याचेच काम नाही."
"दोघांनीही आपल्या आपल्या परीने जबाबदारी उचलली पाहीजे"

त्या जोडप्याने अगदीच मनांवर घेतलं.


ति आता जबाबदारीने `घर' सांभाळते आहे आणी तो........
`बार'.

"किती किती हे पत्नी प्रेम!!!"

एका रम्य सांयकाळी भावनाविवश पती पत्नी मधील संवाद.
पती: "समज, माझं अकाली निधन झालं, तर तु दुसर लग्न करशील का?"
पत्नी: " नाही, मी दुसरं लग्न नाही करणार." " मी आपलं माझ्या बहिणीसोबत राहिन." " पण तुम्ही सांगा, माझ निधन झालं तर?"
पती: " मी पण नाही दुसर लग्न करणार. मी ही तुझ्या बहिणीसोबतच राहीन."

म्हणी, नशिब, अपवाद व आपण!!!

म्हणी, नशिब, अपवाद व आपण!!!
काल बसची वाट पहात थांब्यावर उभा होतो. गर्दी तशी फारशी नव्हती. एकुण ५-६ लोक असतील. इतक्यात एक आज्जीबाई आणी तिचा नातु तिथे आले. त्यांच्यात काहीतरी बिनसले होते वा त्या बाई त्याला उपदेशाचे डोस पाजत होत्या. त्या म्हणाल्या, "चुली पुढं हागायचं आनं नशिबात होतं म्हणायचं, अस कस जमल बाबा?" इतक्यात माझी बस आली व मी निघालो. पण त्या आज्जीबाईंनी वापरलेली ती `म्हण' डोक्यातुन जाता जाईना.
एक तर खुप दिवसांनी इतकी चपखलपणे बसणारी म्हण एकायला मिळाली व दुसरे म्हणजे नशिबावर गरजेपेक्षा ज्यास्त अवलंबुन रहाणाऱ्यांसाठी एक शालजोडा ही वाटला. खर सांगायचे म्हणजे मलाही खुप चिड आहे, नशिब नशिब म्हणत आपल्या अपयशावर ढोंगीपणे पांघरुण घालणाऱ्यांची. असो, जावू द्या, विषयांतर होते आहे. त्यावर परत कधी बोलू. आता फक्त म्हणी आणी म्हणींवरच..
हजारो वाक्ये वापरून जो परिणाम साधता येत नाही, त्यावेळेस एखादी म्हण सगळा आशय गर्भीत करते. बरे प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे म्हणयाचे तर त्यासाठीही पर्यायी म्हणी आहेतचकी. बाळपणांपासून आपला तसा म्हणींशी संबध येतोच की.
आता कांही म्हणींबाबत गमती जमती. एक म्हण, " बाप तसा बेटा अनं कुंभार तसा लोटा" अस म्हणाव म्हंटल तर अमिताभ बच्चन व अभिषेकला ती लागु होत नाही. मग त्यांना कोणती म्हण लागु होते? " मुळांपोटी केरसुनी". (क्रमश:)

Saturday, February 25, 2006

एक लघु प्रेम कथा

त्याने विचारले " माझ्याशी लग्न करशील का?"

ति म्हणाली " नाही".

राहिलेले त्याचे आयुष्य मजेत गेले.

Appraisal Vs Resignation...

Comparison study: Appraisal and Resignation

In Appraisal meeting they will speak only about your weakness, errors, and failures.

In resignation meeting they will speak only about your strengths, past achievements and success.

In Appraisal you may need to cry and beg for even 10% hike.

In resignation you can easily demand ( or get even without asking ) more than 50-60% hike.

During Appraisal, they will deny promotion saying you didn't meet the expectation, you don't have leadership qualities, u had several drawbacks in our objective/goal.

During resignation, they will say you are the core member of team; you are the vision of the company how can you go, you have to take the project in shoulder and lead your juniors to success.

There is 90% chance for not getting any significant incentives after appraisal.

There is 90% chance of getting immediate hike after u put the resignation.

Thursday, February 23, 2006

हे मना बन दगड...

हे मना बन दगड
बनलं माझं मन दगड
काळच पण त्याच्यावर
तुझं नांव कोरलेलं.
...आता काय करायचं?

Tuesday, February 21, 2006

What is Bird Flu?

FREQUENTLY ASKED QUESTIONS ABOUT BIRD FLU
(AVIAN INFLUENZA)
1. What is Bird Flu?

Bird flu or avian influenza is an infectious disease of birds ranging from mild to severe form of illness. All birds are thought to be susceptible to bird flu, though some species are more resistant to infection than others. Some forms of bird flu can cause illness to humans.

2. What causes bird flu?

Bird flu is caused by different subtypes of influenza A virus affecting chickens, ducks and other birds Viruses which cause mild disease can mutate into viruses that can cause serious disease (highly pathogenic).
To date, all outbreaks of the highly pathogenic form have been caused by Influenza A /H5N1 virus, the only subtype that cause severe disease in humans.

3. How is bird flu transmitted in chickens and other birds?

Direct contact with discharges from infected birds, especially feces and respiratory secretions
Contaminated feed, water, cages equipment, vehicles and clothing
Clinically normal waterfowl and sea birds my introduce the virus into flocks
Eggs from infected hens can break and contaminate incubators
Birds that survive infection excrete virus for at least 10 days, orally and in feces. Highly pathogenic viruses can survive for long periods in tissue, water and the environment, especially when temperatures are low.


4. How do outbreaks of bird flu spread within the country?

1. Domestic birds can get the infection when they:
roam freely
share water supply with wild birds
use a water supply that might be contaminated by infected droppings

2. Contaminated equipment, vehicles, feeds, cages, or clothing, especially shoes can carry the virus from farm to farm

3. Wet markets where live chickens and other birds are sold under crowded and sometimes unsanitary conditions

5. How is bird flu transmitted to humans?

Bird flu is transmitted to humans from direct or indirect contact with infected wild ducks and chickens through infected aerosols, discharges and surfaces.
A person handling or taking care infected chickens or came near or inside a poultry or market where there are sick chickens can inhale the particles from dried discharges or feces with the bird flu virus.
Discharges can get in contact with the nose or eyes of a person handling infected chickens.
There is no reported case of bird flu in humans after handling dressed chicken. Since the virus is easily inactivated by heat, one does not get bird flu from thoroughly cooked chicken meat.
There is no evidence of human-to- human transmission.


6. Why are we concerned with bird flu?

There are a number of reasons why we are concerned with bird flu:
Bird flu or Avian influenza (AI) causes serious illness and death in humans
Avian and human influenza viruses can recombine to form a totally new influenza A virus which is capable of spreading from person to person and from which the human population do not have protection
AI causes severe epidemics and mass death of chickens affecting the poultry industry.

7. What are the signs and symptoms of bird flu in chickens?

Infection causes a wide spectrum of symptoms in birds, ranging from mild illness to a highly contagious and rapidly fatal disease resulting in severe epidemics.
Decrease in activity
Drastic decline in egg production
Facial swelling with swollen and bluish-violet colored combs and wattles
Hemorrhages on internal membrane surfaces
Virus isolation needed for definitive diagnosis
Gasping for breath
Muscle
Weakness/paralysis
Diarrhea
Sudden deaths (mortality that can reach 100%)

8. What are the signs and symptoms of bird flu in humans?

Bird flu is very similar to other influenza viruses. Initial symptoms are :
Fever
Muscle weakness and/or pain
Sore throat and cough
Sore eyes (conjunctivitis) is seen in some patients
Causes of death and complications are:
Severe viral pneumonia
Respiratory distress syndrome
Multi- organ failure

9. Since there are so many cases of influenza, pneumonia or any other respiratory illness, when does one suspect that the patient is a case of bird flu?

One suspects that a patient with influenza or pneumonia or any other respiratory illness is a case of bird flu avian influenza if the patient has had direct or indirect contact through handling or having taken care or getting near sick chickens or other birds.
A laboratory confirmation of the bird flu infection and epidemiologic link with unusual death or epidemics of chickens will support the diagnosis of bird flu.

10. What is the treatment of bird flu?

Treatment for H5N1 infection is essentially the same as for other influenza viruses. Antiviral drugs, some of which can be used for both treatment and prevention, are clinically effective against influenza A virus strains in otherwise healthy adults and children, but have some limitations. Some of these drugs are also expensive and supplies are limited.

11. Is there a vaccine against bird flu?

No. The vaccine currently available against the circulating strains in humans will not protect from the disease caused by H5N1. However, it is recommended for individuals who are potentially exposed to bird flu like poultry handlers, workers and breeders to prevent recombination of avian with the human influenza virus.

12. How do we prevent bird flu?

Thoroughly wash hands with soap and water before and after handling chicken meat
Clean kitchen surfaces and utensils before and after use
Cook chicken well by seeing to it that the boiling temperature is reached
Do not sell live chickens in the market while there is a threat of bird flu.
Do not let chickens roam freely. Keep them in cages or pens.
Do not place chickens, ducks and pigs together in one area, cage or pen.
Do not catch, get near or keep in captivity wild birds.
Report to authorities any unusual death or illness of chickens and other birds
Report to authorities any case of respiratory illness with history of exposure to sick or dead chickens and other birds

13. Is it safe to travel to countries affected with bird flu?

Bird flu is not transmitted from one person to another. Individuals at risk are those are directly or indirectly exposed to sick chickens and other fowl. The government thereby advises travelers to countries affected with bird flu not to go to bird parks (aviaries), poultry farms or market where live poultry is sold.

शपथ

दहावीच्या निरोप समारंभात चौखुरे गुरुजी भारावून जा‌ऊन म्हणाले, `मुलांनो, आज माझ्यासोबत शपथ घ्या. तुम्ही दारू-सिग्रेटला हात लावणार नाही, मांसाहार करणार नाही!'

मुले म्हणाली, `नाही करणार गुरुजी!'

गुरुजी, `कधी मुलींची छेड काढणार नाही.'

मुले, `नाही काढणार गुरुजी!'

गुरुजी, `कधी जुगार खेळणार नाही.'

मुले, `नाही खेळणार गुरुजी!'

गुरुजी, `देशासाठी जीवही द्याल.'

मुले, `दे‌ऊन टाकू गुरुजी, नाहीतरी अशा रीतीनं जगण्यापेक्षा मरणच परवडेल!!!'

Sunday, February 19, 2006

तु आज इकडे..

तु आज इकडे..
आज परसातला पारिजात पुन्हा बहरला
दारी अंगणी तोच धुंद गंध दरवळला
विश्वास आहेच पण खात्री करतोय,
तु आज इकडे येवून गेलीस का?
...दिलीप

Saturday, February 18, 2006

कुणीतरी आठवण काढतयं...

वाळवंटाच्या देशात...

वाळवंटाच्या देशात...
...झगमगत्या दुनियेत !!!
परत एकदा नमस्कार मित्रहो,
बऱ्याच मित्रांनी आग्रह केल्यामुळे आणी तो न मोडता आल्याने आता
दुबई च्या झगमगत्या दुनियेबाबत एक मालिका सुरु करण्याचे मनावर
घेत आहे. अनेक लोंकाचे दुबई बाबत ज्या परिकल्पना आहेत,
काही समज आणी सोबतच गैरसमजही.
पाहुया प्रयत्न तर करतो आहे, शक्य तेवढी जास्त आणी सत्यच सांगेन.
( हे काही न्यायालय नाही, शपथेवर खोटे बोलायला.) फक्त प्रयत्न असा
असेल की ही माहिती सांगताना न तुम्हाला वाचतानाही तोच तो रटाळपणा
येत आहे असे वाटु नये. सोबतच तुम्हांलाही काही विचारायचे झाल्यास
त्याचेही स्वागत आहे.
भौगोलीक माहिती सांगायची झाल्यास सात राज्ये आपल्या गरजा
आणी सुरक्षाही लक्षात घेवुन संघटीत झाले ते संयुक्त अरब अमिरातच्या
झेंड्याखाली. अबु धाबी ही राजधानी व एकुण क्षेत्रफळ ८३,६०० चौरस
कि.मी. दुबई, शारजाह, रास अल खैमाह, फुजिराह, उम्म अल क्वैवान
व अजमान ही इतर राज्ये. लोकसंख्या २४ लाख मुळ अरब मुस्लीम
परंतु बाहेरचे आलेलेच लोक त्यांच्यापेक्षा संख्येने ज्यास्त. चलन म्हणाल तर दिरहाम आहे आणि १ दिरहाम म्हणजे सध्याच्या दराने १२.२० रुपये.
काहीतरी वेगळा अनुभव, परदेश पहाण्याची ओढ, विमानप्रवासाचे आकर्षण आणी भारतात राहून जेवढा पैसा कमवू शकतो त्यापेक्षा जास्तीची `हाव' हेच आपली माती, आपली मानसं ह्यांच्यापासून दूर जाण्यास कारणे ठरली. एक मन म्हणायच की परदेशी चाललास. वेगळ लोक, वेगळी संस्कृती, भाषा पहायाला मिळेल. चार नविन नविन गोष्टी शिकायला मिळतील. असा विचार करुन मनाला समजावले आणी निघालो.
विमानतळावर प्रवेश केला. सुरक्षा तपासणीचा सोपस्कार उरकला. विमान उड्डाणाला अजुन २ तास अवकाश होता. बरेच लोक प्रतिक्षा कक्षात होते. काही माझ्यासारखे नवखे व बुजरे, काही सराईत( गुंड नव्हे) प्रवासी. एक गोष्ट अजब वाटली. माझ्यासारख्या साध्या सरळ माणसाला एवढ्या अग्निदिव्यातुन जावे लागले. तर मग बॉबस्फोट करुन हे लोक कसे सहजा सहजी पळाले? ( खाल्ली ना माती, घेतली ना शंका? कुठेही जा, मराठी माणुस शंका काढणारच.) माझ्या लायकी प्रमाणे शंका ही लघूच होती. त्यामुळे कारणही सापडले. पैसा हो पैसा आणी त्याचे लालच. बॉबस्फोट करणारेही भारतीयच, त्याची झळ पोंहोचलेलीही भारतीयच, चोरट्या वाटेने पळून जाण्यास मदत करणारे ही भारतीय आणी कायद्याचा किस पाडून त्यातील पळवाटा शोधणारे ही भारतीय. हे सगळे असाह्य व निमुटपणे पहाणारे आपणही भारतीयच. एकंदरीत काय `मेरा भारत महान'.
कोणी एका विद्वानाने म्हंटलेच आहे, " पैसा भगवान नही है" व त्यासोबत आणखी एका विद्वानाने म्हंटलेय " लेकिन पैसा भगवानसे कमभी नही है" आणी हे दोन्ही वाक्य माझ्यासारख्या तिसऱ्या विद्वानाला माहित आहे. ह्याचा परिचय देणाऱ्या दोन गोष्टी लागलीच अनुभवाला मिळाल्या.
पहिली म्हणजे एक बाई, एका हातात बॅग आणी कडेवर मुल घेवुन जिणा उतरत होती. तिने अवघड झाले म्हणून तिथल्या एका कामगाराला मदतीला बोलावले. पण त्याने तिकडे कानाडोळा करुन एक गोऱ्या जोडप्याच्या मदतीला गेला. मी पहातच राहिलो. ( दुसरे काही करु शकतो का?). नंतर तो कामगार माझ्या बाजुला येवून त्याचे `चेतना चुर्ण' म्हणजे तंबाखू मळत बसला. न राहवून मी त्याला जाब विचारला की बाबा तु आपल्या माणसाला मदत करायची सोडून त्या ईंग्लिश जोडप्याकडे का धावलास? त्यावर तो म्हणाला "ह्या बाईला मदत केली आसती तर ज्यास्तीत ज्यास्त आभार मानले असते. पण त्या गोऱ्याने मला २ डॉलर बक्षिस दिले. आता तुम्ही सांगा, मी शहाणा ठरलो कि नाही".
मी मनातल्या मनात विचार केला खरच होते की त्याचे. पैसा बोलता है, दुसरे काय? मनोमनी मी त्याला साष्टांग दंडवत केला. (क्रमश:)

तुम्हीच ठरवा ह्याला काय म्हणायचे?

तुम्हीच ठरवा ह्याला काय म्हणायचे?
संदीप हा भैय्यासाहेब देशमुखांचा एकुलता एक मुलगा. दोन दिवसांवरच त्याच्या पदवी परिक्षेचा निकाल होता. भैय्यासाहेबांचे संदीपला खुप खुप शिकवण्याची इच्छा होती आणी संदीपही तसा हुशारच होता. आतापर्यंत तो नेहमी पहिल्या तिघात असायचा. त्यामुळे पदवी मिळवल्यावर ते त्याला एक मौल्यवान भेट देणार होते.
संदीपही ती भेट कोणती ते जाणुन घेण्यास उत्सूक होता. त्याने अशी ही तयारी केली होती की भैय्यासाहेबांनी जर त्यालाच विचारलेच व निवडीचा पर्याय दिला तर तो चांगली स्पोर्ट कार घेणार होता. तशी एक गाडी त्याने पाहून ठेवली होती. आपला हट्ट पुरवणे तसे भैय्यासाहेबांना अवघड नाही व पैशाची काही कमतरता नाही. त्यामुळे आपण निकालाच्या दिवशी आपल्या आवडत्या गाडीमधून फिरणारच अशी त्याची मानसिक तयारीही झाली होती. म्हणुन तो एकदम खुषीत होता.
आणी अखेर तो दिवस उजाडला, ज्याची तो आतुरतेने वाट पहात होता. सकाळी सकाळीच भैय्यासाहेबांनी त्याला आपल्या खोलीत बोलवून घेतले. प्रेमाने जवळ घेवून म्हणाले, " संदीप, तुझ्या सारखा गुणी, हुशार आणी सालस मुलगा मिळणे खुप कमी लोकांच्या नशिबी असते. त्यामुळे मला तुझा खुप अभिमान वाटतो. नेहमी प्रमाणे आजही तु यशस्वी होणारच अशी माझी खात्री आहे. त्यासाठी माझ्याकडुन ही छोटीसी भेट देत आहे. तुला ती नक्कीच आवडेल, अशी आशा आहे." असे म्हणत त्यांनी एका सुंदर आवरण असलेला बॉक्स त्याच्या हाती दिला.
अती उत्साहाने व नाराजीनेच त्याने तो बॉक्स उघडला, पहातो तर त्यात भगवद गीतेची प्रत होती.
ते पहाताच संतापाच्या भरात तो म्हणाला, " एवढ्या मोठ्या मिळकतीचे मालक असुन तुम्ही मला भेट काय देताय तर हे?" असे म्हणत तो रागाने, ती भेट तिथेच ठेवून, रागे रागे घर सोडुन निघून गेला.
त्यानंतर बराच काळ लोटला. त्याने परत कधी घराकडे परतण्याची तसदी घेतली नाही. आपल्या अंग हुषारी, मेहनती व कलागुणांच्या जोरावर त्याने अनेक व्यवसायात नांव व पैसा कमावला. त्यासोबतच सुशिल पत्नी आणी गोंडस मुले अशा सुखी आणी यशस्वी जीवन जगत होता. आलिशान गाडी, टुमदार बंगला, नौकर चाकर सगळी सुखे त्याच्या समोर हात जोडून उभी होती. त्यामुळे दरम्यानच्या काळात ना त्याला आपल्या वडीलांशी संपर्क साधावा वाटला, ना तशी गरज वाटली.
पण हल्ली त्याला वाटु लागले होते की आपले वडील आता म्हातारे झाले आसतील. त्यांना एकदा तरी पहावे. मनाशी तयारी करुन त्याने वडीलांना भेटण्यासाठी जायचे ठरवले. पत्नी आणी मुलेही त्याच्या हया विचाराशी सहमत व आनंदी झाली. सगळी तयारी करुन निघणार एवढ्यात त्याच्या हातात `तार' येवून पडली. संदेश होता, " तुमच्या वडीलांना देवआज्ञा झाली. त्यांनी सगळी संपत्ती तुमच्या नांवे केली आहे. तरी ताबडतोब येवून, सगळी संपत्ती आपल्या ताब्यात घ्यावी हि विनंती." मन भरुन आले त्याचे, कसेतरी स्वताला आवरुन तो वडिलांच्या घरी आला.
घरी येताच त्याला जाणिव झाली की आपण सगळेच गमावले. दुर्देव असे की आपल्याला शेवटचे दर्शन ही मिळू शकले नाही. डोळ्यात पाणी अन जड अंतकरणाने तो वडिलांची महत्वाची कागद पत्रे शोधु लागला. कागद्पत्रा सोबतच त्याला सापडली तिच भगवद गीतेची प्रत, जशीच्या तशी नवी कोरी. डोळ्यात पाणी थांबत नव्हते. त्याला आठवले ह्याच क्षणी आपण आपल्या वडिलांना शेवटचे पाहिले होते. भरल्या अंतकरणाने तो त्याची पाने चाळू लागला. इतक्यात त्यातून काही तरी जमिनीवर पडल्याचा आवाज आला. तो उचलून पहातो तर काय? ती होती कार ची चावी अन त्यासोबतच जोडलेली चिट्ठी त्याच्या पदवीदान सभारंभाची तारीख असलेली, आणी त्याच विक्रेत्याची जिथे त्याने कार निवडली होती त्याची, लिहीले होते PAID IN FULL.


....दिलीप कुलकर्णी. दुबई. १८.०२.०६

Tuesday, February 14, 2006

गजरा

Monday, February 06, 2006

नियोजित चाकण पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ

हे आहेत नियोजित चाकण पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काही फोटो.
जर राजकारण्यांच्या तावडीतुन सुटुन खरच पुर्ण झाला तर हा
दक्षिण आशियातील नंबर १ चा विमानतळ असेल!!!
सोबत पुणे-चाकण नियोजित जलद मार्गाचेही फोटो.

मस्त रे कांबळे.... सचिन तेंडुलकर.
तमाम मित्रांनो, मला आता वय, वेळ सगळ्यांचे भान सोडुन नाचावेसे
आणी मला खात्री आहे की, तुम्हीही माझ्या सोबत ताल धराल.
मी खुष आहे. मी खुष आहे. मी खुष आहे. मी खुष आहे.
मी खुष आहे. मी खुष आहे. मी खुष आहे. मी खुष आहे.
तुम्ही मला कदाचित `वेडा' ही म्हणाल
माझ्या खुशीला कारण आहे ते सच्चू चे आजचे दणदणीत शतक!!!
आधुनिक पुणेरी शब्दात सांगायचे म्हणजे ` मस्त रे कांबळे!!!'
शाब्बास सचिन, बेस्ट रे बाप्पू!!!
काही दिवस फक्त काहीच दिवस, सचिनच्या धावांचा ओघ काय थोडा
कमी झाला की, कोणीही वरतोंड करून बकबक करु लागले.
स्वत:ला `तेज' म्हणहुन घेणाऱ्या एका वाहिनीने तर खुपच उत्साहाने टिका
केली होती. आणी मोईन खान नामक एका महापुरुषाने काय काय
अकलेचे तारे तोडले होते.
आजच्या शतकाने साऱ्या त्या अति शहाण्याची बत्तिशी त्यांच्याच घशात
घातली. परत शाब्बास सचिन, तु धिरोदात्त पणे, कोणतीही वायफळ
प्रतिक्रिया न देता, आपल्या फलंदाजीने तु काय चिज आहेस ते
दाखवुन दिलेस. जिओ मेरे यार!!!!!!!
मित्रांनो, तुमच्या संदर्भासाठी काहीची मुक्ताफळे सोबत देत आहे.
म्हणजे तुम्हांलाही कळेल मी किती किती खुश आहे ते, आणी
तुम्ही ही म्हणाल, " मस्त रे कांबळे!!!!!"
आणी वाचल्यानंतर नोंदवा तुमच्या प्रतिक्रिया, त्याचे स्वागतच असेल.
मी आता ही बोलतो आहे पण ह्या आधीही तेवढाच विश्वासाने
बोलत होतो. केवढा ते पहाण्यासाठी वाचा माझा १ फ़ेब्रुवारीचा
"सचिन ने निवृत्त व्हावे का?" हा ब्लॉग.


Beginning of the end for Tendulkar?

January 27, 2006


The Faisalabad Test will go down in the annals of history as another run-feast. But as I see the game, I fear this may just be the beginning of the end of Sachin Tendulkar, the man we all respect, adore and love because of his tremendous natural talent and humble attitude.
The more I look back at his dismissal, the more convinced I get that the downhill journey for the little champion has started because it has been established that, according to the laws of the game, he was not out as the ball had made contact with the right glove that was not in play.
What is even more mindblowing is that he did not look at the umpire and immediately started his long walk towards the pavilion.
I am not willing to buy the theory that Sachin did not know the laws of the game. If Michael Kasprowicz knows them, then I am sure that after playing for 16 years at the highest level and having led his country for a couple of years, Sachin knows all the rules by heart.
Then what prompted Sachin to leave the pitch on which six centuries and two 90s were scored? Hostile bowling by Shoaib Akhtar, or the tension-filled dressing room atmosphere that often gets on the nerves of the batsmen who start feeling suffocated?
Whatever may be the real reason, the fact of the matter is that Shoaib Akhtar literally exposed Sachin's present-day ability against quality fast bowling during a spell that will certainly be remembered for long.
Even on a dead track, Shoaib was charging in at Sachin, bending his back and putting all his energy into his deliveries. One could see those terrifying, hungry and wild looks in the eyes of Shoaib when he reached Sachin at handshaking distance on his follow-through.
As a wicketkeeper, Sachin's controversial dismissal also reminded me of a few batsmen who preferred walking off the pitch on their legs rather than being carried away on stretchers when the great Wasim Akram and Waqar Younis were at their brilliant best. I wish I am wrong in my assessment of Sachin, but, at least, that is the impression he has left after his Faisalabad outing.
Maybe when he takes an emotional walk in the National Stadium in Karachi, the desire of continuing for a few more years with distinction and merit will be re-ignited. But for the moment, the Sachin I saw batting at Faisalabad was certainly a shadow of the Sachin who courageously faced and ruthlessly punished the greatest bowlers of the past decade.
Having watched Shoaib's dedication and commitment, I feel sorry that he is not getting more conducive pitches as the wickets prepared for the first two Tests were highly biased towards batsmen. But at the same time it is pleasing to note that it is Pakistan's negative strategy and curators' poor craftsmanship that is under the scanner and not Shoaib's attitude and approach.
Rudra Pratap Singh won the Man-of-the-Match for his five wickets in the batsman-dominated Test, but the left-arm pacer's inclusion does not entirely absolve Rahul Dravid of the criticism he is getting for dropping Sourav Ganguly.
Dravid contradicted himself by including Sourav for the Lahore Test citing his experience but then picking an inexperienced Yuvraj Singh as the fifth specialist batsmen for Faisalabad.
You can gamble with an inexperienced batsman when playing with a six-four-one combination but when you decide to take the field with a five-five-one combination, the margin for error is little and consequently you prefer to pick the men in-form.
In the present scenario, probably most would have voted for Sourav because of his experience after both failed to get a chance to bat in Lahore.
For me, the best performer of the match was Mahendra Singh Dhoni who scored a sizzling 144, but more importantly, pulled the Indian team out of dire straits and earned a slender but important 15-run first innings lead.
Dhoni was all at sea against Shoaib Akhtar early on but when Shoaib was out of the attack, he put the Pakistan bowling to the sword. The way he presents himself, walks and bats, I think cricket desperately needs entertaining characters like him to make the sport more glamorous and attract more crowds. He may be unorthodox in technique, but who cares when he scores like that.
The fielding of both teams remained below par. On a wicket where bowlers are at the mercy of batsmen, fielders need to be on the alert and convert half chances into wickets. But unfortunately, only Yuvraj Singh and Danish Kaneria managed to pulled off stunners while V V S Laxman, Imran Farhat, and Kamran Akmal dropped sitters.
There has been a debate on Pakistan's decision to bat out the entire fifth day. Although I believe Pakistan should have given the Indians at least 35 overs to bat, their decision to opt for batting practice makes more sense.
At lunch, Pakistan's lead was not big and by the time they batted India out of the match, there was no time left. Shoaib Akhtar is already carrying a niggle in his ankle and it would have been fatal had he aggravated his injury during that period.
The other thing Pakistan might have thought was to tire the Indian bowlers so much that they felt the strain and pressure in the third Test.
All said and done, seeing the cricket played in the first two Tests, I am glad I am not part of it although it is still a pain to watch.
********************************************

Sachin will make Moin eat his words: Engineer

February 05, 2006 17:55 IST


Former Indian wicketkeeper batsman Farooq Engineer has strongly dismissed Moin Khan's observation saying Sachin Tendulkar is certainly not on decline and will bounce back to make the Pakistani "eat his words".
"Sachin has reached his peak but certainly he is not on the decline. He will bounce back and make Moin Khan eat his words. Experience will only make him better," Engineer said.
Engineer was reacting to Moin Khan's recent column in which he had written: "I get that the downhill journey for the little champion has started... what prompted Sachin to leave the pitch... Hostile bowling by Shoaib Akhtar, or the tension-filled dressing room atmosphere that often gets on the nerves of the batsmen who start feeling suffocated?"
• Beginning of the end for Sachin? Tell us!
Former England captain Nasser Hussein also guarded Tendulkar against any such criticism saying the Indian is one of the greatest batsmen ever played and should not be written off.
"Watch out any one who writes off Tendulkar," Hussain said on Saturday after receiving the HSBC Life Time Achievement Award 2005 organised by Sony Entertainment Television at the Hilton Hotel in London.
"Sachin is one of the greatest batsmen ever played. Though he is idolised as a demi-God in India, he is human and he may have a lean period but he deserves credit for what he has done," he said.
About England's prospects in India in the forthcoming tour, Hussain said: "England have the ability to do well in India. But India in India will be very competitive and one has to watch out. England need to work hard to get 20 wickets and get the upper hand."


Sidhu flays Moin Khan

Onkar Singh in Delhi | February 06, 2006 16:43 IST


Former India batsman Navjot Singh Sidhu says former Pakistan wicketkeeper Moin Khan should be sent to a mental asylum in Amritsar so that he can go and meet him there.
Speaking to rediff.com on Monday after Sachin Tendulkar hit his 39th one-day hundred as India posted 328 in the first One-Day International against Pakistan in Peshawar, the cricketer-turned-Member of Parliament from Amritsar said, "Mad dogs keep barking at the elephant, but the king elephant does not bother about them at all."
Sidhu was obviously hitting out at Moin, who criticized Tendulkar, after India lost the three-Test series to Pakistan 0-1, saying the decline of the little master has begun.
"Sachin has scored a big hundred and this would be enough to silence his critics in the media as well as those like Moin Khan, who had started writing off the master batsman.
"The man who has scored over 70 hundreds in both forms of the game does not need to be reminded about his class and stature.
"Sachin did the right thing by not responding to such mindless criticism. Instead, he let his bat do the talking. Such comments are made by foolish people only," Sidhu added.

Sunday, February 05, 2006

मराठीत ( देवनागरी) लिहीण्यासाठी

नमस्कार मित्रांनो,
आपल्या काही मित्रांना मराठीत लिखाण कसे करायचे ह्याची
माहिती हवी होती. सुरुवातीला मराठीत लिहिण्यात मी ही असंख्य
अडचणींना तोंड दिले. इतर मित्रांना सोपे जावे म्हणुन त्याची माहिती
इथे देत आहे.
त्यासाठी आपणाला बरहा सॉफ़्टवेअर डाउनलोड करावे लागेल. हे
सॉफ़्टवेअर www.baraha.com ह्या संकेतस्थळा वर उपलब्ध आहे. लागणारा वेळ अंदाजे
१ मिनीट आहे व हे मोफत आहे.
आता ह्याची एकदा प्रस्थापना(Install) झाली की तुम्ही की बोर्ड वापरुन
( रोमन लिपीत) टंकलेखन केले की ते देवनागरी मध्ये रुपांतर होते.
तुमचे लिखाण संपले की तुम्ही ते लिखाण सरळ कॉपी पेस्ट करु शकता.
जिथे करायचे आहे तिथे.
काही संकेतस्थळ कॉपी पेस्ट केलेल्या लिखाणाला आधर देत नाहीत.
त्यामुळे सगळ्यांना सुचना की बरहा वर लिखाण संपले की, त्याचे रुपांतर jpg,
bmp,gif,png and pcx ह्या पैकी एका प्रकारात Export केले की कोठेही नोंद करणे सोपे जाते.
बघा प्रयत्न करुन, काही अडचण आल्यास मला लिहा. मैं हुं ना!
dilipkulkarniin@rediffmail.com

साद - प्रतिसाद

खत ( हिंदी पत्र)

चारोळ्या !!!Saturday, February 04, 2006

हम - तुम ( बाळकांड)

(महाराष्ट्र टाईम्स च्या सौजन्याने.)
हम-तुम (बालकांड)

मुलींना लहान वयातही मुलांची ओढ असते.

मुलांना लहान वयात मातीची, चिखलाची, डबक्यांची ओढ असतो.

...........................
मुली मुलांच्या आधी बोलायला शिकतात.

मुले बोलण्याच्या आधी तोंडातून मशीन गनचे आवाज काढायला शिकतात.

टीव्हीवरच्या सिनेमात कुणी मेलंबिलं तर मुली धाय मोकलून रडतात.

असला मारामारीचा आणि मरामरीचा सिनेमा सुरू असताना चॅनेल बदलला तर मुलं धाय मोकलून रडतात.

मुलगा जेव्हा गप्प असतो...

तेव्हा त्याच्याकडे बोलण्यासारखं काही नसतं.

मुलगी जेव्हा गप्प बसते...

तेव्हा तिच्या मनात लाखो उलाढाली सुरू असतात.

लहान मुली मोठ्या होऊन स्त्रिया बनतात.

छोटी मुलं मोठी होऊन मोठी मुलं बनतात.
.........................

लहान मुलीकडे तुम्ही एक बॉल फेका...

... तो बहुतेक वेळा तिच्या नाकावर आदळेल.

लहान मुलाकडे तुम्ही बॉल फेका...

... तो बॉल झेलायचा प्रयत्न करील...

... पण, बहुतेकवेळा बॉल त्याच्याही नाकावर आदळेल!!!

........................................
दिवाळीत कुणाकडे पाहुणे म्हणून जाण्यासाठी तुम्ही मुलीला नवा ड्रेस घालून नटवा...

... ती अगदी छान दिसत असेल... पोहोचायला तासभर उशीर होईल, ते सोडा.

दिवाळीत तुम्ही मुलाला नवा ड्रेस घालून नटवा...

... तो दोन मिन्टांत तयार होईल...

पण, प्रत्यक्षात जायला निघण्याआधीच तो कुठूनतरी छानपैकी मळून येईल!!!

........................................
मुलांची रूम सहसा अत्यंत गबाळी, अस्ताव्यस्त असते.

मुलींची रूमही गबाळी, अस्ताव्यस्तच असते... फक्त तिथला गबाळेपणाही 'सुवासिक' असतो!!!
.........................................

मुलीला रस्त्यात झाडाची फांदी सापडली, तर ती फांदी कौतुकाने निरखत राहते.
मुलाला अशी फांदी सापडली की लगेच फिरवून तिची गन करून तो ठिश्यांव ठिश्यांव गोळीबार सुरू करतो.

.,.....................................

* केस कसे कापले गेले याविषयी मुलं बेफिकीर असतात. जसे कापले, ती आपली नवी स्टाइल म्हणून ते स्वीकारतात.

मुलींचे केस जर चुकीचे कापले गेले, तर त्या दोन आठवडे घराबाहेरच पडायच्या नाहीत.

.....................................

मुलीच्या हातात आईची मेकअप बॉक्स लागली तर त्या लगेच तोंड रंगवायला सुरुवात करतात.

मुलांच्या हातात आईची मेकअप बॉक्स लागली तर तेही लगेच रंगवायला सुरुवात करतात... पण घराच्या भिंती!!!
..............................

Thursday, February 02, 2006


Dilip Kulkarni Posted by Picasa

टवाळा आवडे विनोद..

. ' मुलांनो, हत्ती व माशी यांच्यात फरक काय? गुरुजींनी विचारले.

स्कॉलर मनू उत्तरली, 'हत्तीला पंख नसतात. माशीला पंख असतात.'

' शाब्बास!' गुरुजी गदगदले, 'आता नन्या, तू सांग हत्ती-माशीतला फरक!'

नन्या म्हणाला, 'माशी हत्तीच्या अंगावर बसू शकते, हत्ती माशीच्या अंगावर बसू शकत नाही!!!'

***************************
कोण चढलेत झाडावर?' करवादे काकू ओरडत बागेत आल्या. पेरूच्या झाडावरून नन्याची फौज खिसे भरून खाली आली. 'काय करत होतात रे?'

' काकू काकू', नन्या गोडव्याचा परमावधी करत म्हणाला, 'आमची विटी अडकली होती झाडावर!'

' हात मेल्या, ही विटी तर मी गेले चार महिने पाहतेय आमच्या झाडावर. तेव्हाच का नाही रे आठवण आली तुम्हाला विटीची?'

' कारण तेव्हा पेरू पिकले नव्हते,' नन्यानं धूम ठोकता ठोकता उत्तर दिले.

**************************************

Wednesday, February 01, 2006

सचिन ने निवृत व्हावे का?


(एका `तेज' डोके चालणा~या वाहिनीने विचारेल्या वरील सवाला
वर माझी प्रतिक्रिया.)

म्हणतात ना यशाचे पाठीराखे भरपुर असतात आणी अपयशाचा धनी तो स्वत.
तसेच आज सचिन चे झाले आहे. सबसे `तेज' वाल्यांची डोकीही तेवढीच तेज
चालतात वाटते.
खर सांगायचे तर सचिनला विश्रांती द्यायची काही गरज नाही. मी त्याच्या धावा
किंवा मागच्या सरासरीच्या पुण्याईवर खेळतच रहावे, अगदी अपयश कितीही
वेळा आले तर असे म्हणत नाही. इतिहास साक्षी आहे. प्रत्येक वेळेस एकादा
गोलंदाज डोईजड होतो आहे असे वाटले की सचिनने वायफळ बडबड
न करता त्या सगळ्याची बत्तीशी धडाकेबाज फलंदाजीने त्यांच्याच घशात
घातली आहे. अशा सा~या गोलंदाजा विरूद्ध नेहमीच यशस्वी प्रत्त्युतर दिलेले
आहे.
`तेज' वाल्यांनी तर पुढे जावून असे ही तारे तोडले कि जेंव्हा सचिन
खिलाडू वॄतीने पंचाच्या निर्णाया आधीच मैदान सोडून गेला तो शोयब अख्तरची
गोलंदाजीला घाबरून ती टाळण्यासाठी निघून गेला. हा `तेज' वाल्यांनी केलेला आणी
याची देहि याची डोळा माझ्या आयुष्यात ऐकलेला सर्वात मोठ्ठा विनोद.

शोयब पाच एकदिवशीय सामन्यांचे घोडा मैदान जवळच आहे. तेंव्हा
`उपरवाले" के पास अभ्भीशेच वशिला लगाव मिंया.

-दिलीप कुलकर्णी
दुबई. यु. ए. ई.
Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>