Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: April 2006

Sunday, April 30, 2006

आवाज कुणाचा...?

आज सकाळी शाळेचा निकाल घेवुन आलेल्या प्रदिपला त्याच्या बाबांनी विचारले.
"प्रदिप, किती टक्के गुण मिळाले?"
प्रदिप(हळु आवाजात): "७७% मिळाले"
बाबा: "अरे एवढे हळु आवाजात का बोलतोस? जरा चांगले ऐकु येईल असे बोल, जोराने."
प्रदिप: "जय भवानी, जय शिवाजी"
.
.
.
.
सर्व मराठमोळ्या बांधवाना, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !!!

Saturday, April 29, 2006

कटू निर्णय....एक विनोद

मुलगा: बाबा, बाबा मला दर महिन्याला जो पॉकेट मनी देता ना. तो थोडा वाढवून द्या. महागाई कसली वाढली आहे.
बाबा: अरे, कस शक्य आहे. परवा तर अर्थमंत्र्यानी सांगितले की सगळ्या गोष्टींचे भाव स्थिर राहतील. मी पाहिल्या ना बातम्या.
मुलगा: तुम्ही पण ना बाबा, अहो तुमचा विश्वास स्वताच्या मुलावर ज्यास्त आहे की अर्थमंत्र्यावर??

आरक्षण......

आरक्षणाच्या सुवर्णकाळातील निधर्मी भारतातील एक विवाह विषयक जाहिरात....
वर पाहिजे..
वधु, सुंदर, उच्च शिक्षीत, वैद्यकिय पदविधर, पण नौकरी नाही. सर्व गुण संपन्न, मनमिळावु, घर कामात पारंगत, वर दक्षिणा देण्याची तयारी, मंगळ नाही पण जात ब्राम्हण आहे.
अपेक्षा...
शिक्षण, रुप, बुध्दीमत्ता, आर्थिक परस्थीती, स्वताचे घर यापैकी काहीही नसले तर चालेल पण मुलगा
आरक्षणाची सोय असलेल्या जातीतील असावा.
विधुर, अपंग, घटस्फोटीत चालेल. मुलीची धर्मांतरही करण्याची तयारी.

Tuesday, April 25, 2006

आस..

निरोप घेताना खोल स्वरात
तो जेंव्हा पुटपुटला
परत भेटण्याची आस मी
सोडली नाही.
तिचे डोळे चमकले
कस शक्य आहे?
प्रश्नातच तो उत्तरला..
का?
पुनर्रजन्मावर तुझा विश्वास नाही..?

स्पेलिंग

टीचर : नन्या, तुझा जन्म कुठे झाला?

नन्या : तिरुवनंतपुरममध्ये.

टीचर : स्पेलिंग सांग मला त्याचं.

नन्या (डोकं खाजवून) : टीचर, मला वाटतं माझा जन्म ना गोव्यात झाला होता!!!!

Sunday, April 23, 2006

मैत्रीण(Girl Friend) व बायकोत फरक काय?

एकाने विचारले, "मैत्रीण व बायकोत फरक काय?"

त्या बुद्धीवंताने सांगितले,

एवढाच जेवढा दवा व दारु मध्ये असतो तोच.

मैत्रिण दवा सारखी असते, तिच्या सोबत एक्सपायरी डेट असते.

पण बायको दारु सारखी असते.

जितकी दारु जुनी जुनी होत जाते, तशी तशी ति

डोक्याच्या वरपर्यंत पोहोंचत जाते.

Saturday, April 22, 2006

कुणाला कशाचे, तर कुणाला कशाचे??? (एक विनोद)

अजयकडे नवीकोरी टोयोटा लॅंड क्रुझर पाहून संजयचे डोळेच पांढरे झाले. संजय म्हणाला, "का रे अजय, एवढी नवी कोरी, महागडी गाडी, कुठून आणलीस? काय लॉटरी वगेरे लागली की काय?"
अजय म्हणाला, "त्याचे काय झाले, काल हायवेवर एका गोऱ्या मॅडमने मला लिफ्ट दिली. खंडाळ्याला एका जंगलात आत गाडी ने‌ऊन ती गाडीबाहेर पडली. सगळे कपडे काढून एका खडकावर जा‌ऊन आडवी झाली आणि म्हणाली, तुला हवं ते घे तू!"
"मग, पुढे काय?" संजयची उत्सुकता.
अजय म्हणाला, " पुढे काय? अरे एवढी सोन्यासारखी संधी मी सोडतो कि काय? घेतली गाडी आणी आलो."
संजय म्हणाला, "बरे झाले तु गाडी घेतली ते !!! नाहीतर कपड्याचा तुला काही उपयोग ही झाला नसता."

Sunday, April 16, 2006

पी.जे. फालतु जोक्स

एका लहान मुलीला २ प्रश्र्न विचारले.
"तुझे नांव काय?" व "तु कुठे चालली आहेस?"
तर ती मुलगी दोन्ही प्रश्र्नांचे एकच उत्तर देते.
मग सांगा आता, त्या मुलीचे नांव काय?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

शिला.
*****


१४ नोव्हेंबरला बालदिन का म्हणतात ?
कारण त्याधी बरोब्बर ९ महिने (१४ फेब्रुवारीला) व्हेलेन्टाईन्स डे असतो !
***


एक भाषांतर (translation)
चंदनाची चोळी अंग अंग जाळी
sandel's Bra Body Body Net

***


कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
कारण वाटेत नळ स्टॉप आहे.

***


दोघेजण चालले आहेत. त्या पैकी मुलगा कोणता आणी मुलगी कोणती हे समोरुन न बघता कसे ओळखाल?
सोप्पं आहे.
काही तरी चावट जोक मारायचा.
लाजेल तो मुलगा..

***


कोर्टात गांधीजींचा फोटो कशाला लावतात..?
....खिळ्याला !!!

***


एकदा मास्तर बंड्याला वर्गात उभा करतात आणी सांगतात,
" मी कुठला ही प्रश्न विचारला कि त्याच पटकन उत्तर दे".
मास्तर विचारतात," अमेरिकेचे अध्यक्ष कोण?"
बंड्या म्हणतो," पटकन."

***


पहिला भिकारी : जर तुला एक करोड रुपयाची लॉटरी लागली तर, तु काय करशील?
दुसरा भिकारी : मी विमानात बसुन भिक मागेन.

***


पुणे हे विद्येचं माहेर घर आहे.
पुणे हे विद्येचं माहेर घर आहे.
पण...पण..पण.....
विद्या सासरी गेली आहे.

***

मुलगा :- "मुली तुला चहा येतो का ?"
मुलगी :- "ईश्श्श .. मला अजुन दूध येत नाही, चहा काय येणार?"
***

सोबत...?

घडुच नये असे काही, जर विपरीतच घडल,
मृत्युने माझ्याआधीच तुला कवटालले....
तर...
तुझ्या निरोपाला मी नसेन हजर तिथे,
होवु नकोस नाराज, कृतघ्नही समजू नकोस
जळताना चितेवरही जरा वळुनी पहा
बाजुच्याच चितेवर, तुजसवे..मी ही जळत असेन.
........दिलीप

Thursday, April 13, 2006

दारु पिताना पाळावयाची काही तत्वे.

सर्व मदिरा प्रेमीसाठी, मदिरा सेवन पुण्य कर्म यज्ञ करताना पाळावयाची कांही तत्वे.
न पिणाऱ्यांसाठी एक मजेशीर वाचन आनंद. आपण कांही आणखी भर घालु शकलात तर आपले स्वागतच आहे. नाही तर काहीच हरकत नाही, वाचायला थोडेच पैसे पडतात???

Wednesday, April 12, 2006

दारु पिताना कांही तत्वे पाळावीच लागतात....

Tuesday, April 11, 2006

व्वा सलमान व्वा !!!

हि एक बातमी....

चिंकारा शिकार प्रकरणी सलमानला पाच वर्षे कैद
जोधपूर, ता. १० - चिंकाराच्या शिकार प्रकरणी प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला येथील न्यायालयाने आज पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्याला अटक करण्यात आली असून, येथील मध्यवर्ती तुरुंगात त्याची रवानगी करण्यात आली.


आणी हा त्या बातमीचा परिणाम........!!!!!!


सलमानला झालेल्या शिक्षेची बातमी ऐकून त्याची आई सलमा ह्यांना मानसिक धक्का. लिलावटी मध्ये दाखल.

आणखी एक बातमी.....

सलमान खानची 'लँड क्रूझर' गाडी 28 सप्टेंबर 2002 च्या मध्यरात्री वांद्यात भरधाव धावत असताना एका बेकरीसमोरच्या फुटपाथवर घुसली. रस्त्यावर झोपलेल्या नूरुल्ला महबूब शरीफ या वृद्धाचा मृत्यू ओढवला, तर 17 वर्षांचा अद्बुल र‌ऊफ शेख जबर जखमी झाला. आणखी दोघे-कलीम मोहम्मद पठाण आणि मुन्ना मला‌ई खान- जखमी झाले. बेधुंद ड्रायव्हिंगबद्दल सलमानला पोलिसांनी पकडले खरे; पण रातोरात केवळ भरधाव गाडी चालवल्याबद्दलचा दंड भरून सलमान सुटलादेखील!

आता माझ्या भाबड्या मनाला पडलेले तेवढेच भाबडे प्रश्न....
१) काय प्रसंग ओढवला असेल त्या मयताच्या कुटुंबीयांवर???
२) जखमींच्या घरच्यांचे काय?
३) त्यांना जो मानसिक धक्का बसला असेल त्यावर मिळाले असतील त्यांना उपचार, लिलावटीचे सोडाच पण एकाद्या छोट्या रुग्णालयात तरी??

Saturday, April 08, 2006

कुत्ते शादी करते हैं क्या?

आपका क्या खयाल है?
मेरे खयाल से शादी नही करते होंगे, क्यौं कि....
शादी किये बगैर ही वो कुत्तोंकी जिंदगी जी सकते है !
पर इन्सान.....

यु अन्ड आय ( U & I ).

Hey I just wanted to say you something really interesting.

Please read the next few lines…..

Whoever invented A, B, C, D, E, …. …Z did a great thing.
But he kept U and I very far.

But I got the place where U and I are very close.
In fact together.

Do you know where U and I can be together???
.

Scroll down .
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.



It is on the keyboard !!!!!
.
POPAT, do not see keyboard now !!!!

Thursday, April 06, 2006

बाबा काय काम करतात?

चाळीतल्या एका कडे पाहुणे म्हणुन आलेल्या आजोबांनी शेजारच्या
जोशी काकुंच्या बंड्याला विचारले.
"काय रे बंडु, तुझे बाबा काय काम करतात?"
त्यावर बंडु न गोंधळता उत्तरला,

" आई सांगेल ते सगळे !!!"

Monday, April 03, 2006

आता खोटेपणाचाही परमावधी !!!

महापालिकेच्या शाळेतल्या गणप्याने कालही शाळेला बुट्टी मारली. आज शाळेत आल्या आल्या जोशी मास्तरांनी फैलावर घेत विचारले.
" का रे गणप्या, काल का नाही आला शाळेला?"
खाली मुंडी घालुन हळुच आवाजात गणप्या उत्तरला,
" काल माझा बा मेला"
हे ऐकुन मास्तरांचा संताप अनावर झाला.
" प्रत्येक वेळेस गणप्या तु माय मेली, कधी बा मेला म्हणतोस. किती वेळा असे किती दिवस खोटे बोलणार रे तु?"
"म्या खोटं नाही बोलत मास्तर, तुमच्या गळ्याची आन घेवुन सांगतोय. माझा बाप मेला कि माय दुसर लगीन करतीया अन माय मेली कि बा दुसरी माय आणतुया. ह्यात माझ्या शिक्षणाचा बोऱ्या वाजतुया. आता म्या तरी काय करणार? "

देवाला सगळ्यात ज्यास्त राग कधी येतो???

जर एकाद्या मुलीवर `बलात्कार' होतो आणी तिचे माय बाप टाहो फोडुन म्हणतात,
"अरे देवा, काय केलेस रे हे?"
तेंव्हा !!!

आशावादाचा परमावधी केव्हा होतो?...

99 वर्षांची म्हातारी जेव्हा 'हच का नया लाइफटाइम रिचार्ज' घेते!

Sunday, April 02, 2006

बाप रे पुन्हा एकदा सरदार !!!

एक सरदारजी रिटायर झाल्यानंतर काहीतरी करावयाचे म्हणुन रेडिमेड कापडाचे दुकान चालु केले.
पहिल्याच दिवशीचा ग्राहकाशी सवांद.
ग्राहक: "मला जरा अंडरवियर दाखवा, कोणत्या रंगाची आहे?"
सरदार: " माफ करा, सकाळी घाईत घालायचेच विसरलो".
आता बोला !!!
Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>